ऑल इंडिया सैनिकी शाळा प्रवेश परीक्षेमध्ये पिंपरखेड शाळेची दमदार कामगिरी

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : ऑल इंडिया सैनिक स्कूल एक्झाम 2024 मध्ये जामखेड तालुक्यातील पिंपरखेड प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश मिळवत दमदार कामगिरी केली आहे. (All India Military School Entrance Exam 2024 Results)

Pimperkhed School strong performance in All India Military School Entrance Exam 2024, All India Military School Entrance Exam 2024 results,

ऑल इंडिया सैनिकी शाळा प्रवेश परीक्षा निकाल नुकताच जाहीर झाला.यामध्ये पिंपरखेड शाळेतील सार्थक भाऊसाहेब ओमासे (212 गुण), समर्थ संजय ढोले (200 गुण), अर्णव सुभाष ओमासे (181 गुण), संकेत सुभाष लबडे (179 गुण), सार्थक जालिंदर कदम (135 गुण) घवघवीत यश संपादन केले.

यशस्वी विद्यार्थ्यांना भगवान साळुंखे सर, मुख्याध्यापक भोसले सर, प्रवीण शिंदे सर, सुभाष सरोदे सर, कोथमिरे सर, इंगोले सर,मधुरकर सर, जरे मॅडम यांचे मार्गदर्शन आणि पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले.

पिंपरखेड शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे, विस्ताराधिकारी सुनील जाधव, केंद्रप्रमुख बडे व पिंपरखेड ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

shital collection jamkhed