जामखेड : आमदार प्रा राम शिंदे व खासदार सुजय विखे यांच्या प्रयत्नातून पाच रस्त्यांच्या कामांसाठी 10 कोटींच्या निधीस मंजुरी, मंजुर कामांची ई -टेंडर प्रक्रिया झाली सुरू !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । कर्जत-जामखेड मतदारसंघात रस्त्यांचे जाळे मजबुत करण्यासाठी आमदार प्रा राम शिंदे आणि खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांनी डिसेंबर 2022 च्या नागपूर हिवाळी अधिवेशनात प्रस्तावित केलेल्या 5 प्रमुख रस्त्यांच्या कामांसाठी 10 कोटी रूपयांच्या निधीस मंजुरी मिळाली असून सदर कामांची ई-डेंटर प्रक्रिया सुरु झाली आहे, यामुळे कर्जत-जामखेड मतदारसंघातील जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कर्जत जामखेड मतदारसंघात रस्त्यांचे मजबुत जाळे निर्माण करण्यासाठी आमदार प्रा राम शिंदे आणि खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांनी हाती घेतलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. डिसेंबर 2022 च्या नागपूर अधिवेशनात सुचवलेल्या 5 प्रमुख रस्त्यांच्या कामांना मंजुर मिळाली आहे. यासाठी 10 कोटी रूपयांचा निधी मंजुर झाला आहे. या कामांची ई डेंटर प्रक्रिया सुरु झाली आहे. लवकरच या कामांना प्रारंभ होणार असल्याने मतदारसंघातील जनतेत समाधानाचे वातावरण पसरले आहे.या कामांची ई डेंटर प्रक्रिया सुरु झाली आहे. लवकरच या कामांना प्रारंभ होणार असल्याने मतदारसंघातील जनतेत समाधानाचे वातावरण पसरले आहे.

कर्जत जामखेड मतदारसंघातील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आमदार प्रा राम शिंदे यांनी वैयक्तिक पातळीवर लक्ष घालून शासन दरबारी जोरदार पाठपुरावा हाती घेतला आहे. गेल्या तीन चार दिवसांपासून मतदारसंघासाठी आमदार प्रा राम शिंदे यांनी कोट्यावधी रूपयांचा निधी मंजुर करून आणला आहे, तसेच स्थानिक विकास निधीतून कोट्यावधी रूपयांची कामे प्रस्तावित केली आहेत, यामुळे मतदारसंघात आमदार प्रा राम शिंदे यांच्या माध्यमांतून विकासाचा नवा झंझावात निर्माण झाला आहे. यामुळे मतदारसंघातील जनतेत आनंदाचे वातावरण पसरले आहे. आमदार प्रा राम शिंदे यांनी टीका टिप्पणीचे राजकारण न करता विकासाच्या राजकारणावर लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे विरोधकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

आमदार प्रा राम शिंदे यांच्या माध्यमांतून कर्जत-जामखेड मतदारसंघातील अनेक महत्वाच्या रस्त्यांची कामे मार्गी लागु लागले आहेत. यामुळे मतदारसंघात दळणवळणाच्या सुविधा आता अधिक वेगवान होण्यास मदत होणार आहे.यामुळे मतदारसंघातील जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आमदार प्रा राम शिंदे आणि खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांच्या प्रयत्नातून मंजुर झालेली रस्त्यांची कामे खालील प्रमाणे

1) जामखेड जमादारवाडी सारोळा खुरदैठण गुरेवाडी धोंडपारगांव रस्ता प्रजिमा -106 कि.मी 0/00 ते 3/00 मध्ये रूंदीकरण व सुधारणा करणे.ता.जामखेड जिल्हा अहमदनगर (भाग जामखेड ते सारोळा) एकुण निधी – 300 लक्ष

2) चौंडी आघी जवळा ते जिल्हा हदद रस्ता प्रजिमा 103 किमी. 10/700 ते 12/00 मध्ये सुधारणा करणे. ता.जामखेड जिल्हा अहमदनगर (भाग जवळा गांव ते मुंजेवाडी फाटा ) एकुण निधी – 200 लक्ष

3) रा मा – 68 भाम्बोरा दुधोडी बेर्डी देऊळवाडी सिध्दटेक पवारवाडी जलालपूर रस्ता प्रजिमा – 111 कि.मी 8/600 ते 10/000 व 11/800 ते 13/200 मध्ये सुधारणा करणे ता.कर्जत (भाग दुधोडी ते बर्डी , नवलेवस्ती ते सिध्दटेक ) एकुण निधी – 200 लक्ष

4) आष्टी डोणगांव अरणगांव फक्राबाद नान्नज सोनगांव खर्डा रस्ता रामा-409 किमी 8/00 ते 10/00 (डोणगाव ते सातववस्ती) एकुण निधी – 100 लक्ष.

5) रामा-54 राशिन अळसुंदे निंबे खातगाव लोणी मसदपुर चापडगांव ते प्ररामा – 8 रस्ता प्रजिमा 101 कि.मी 0/000 ते 18/000 ते 18/100 मध्ये सुधारणा करणे.ता.कर्जत (भाग अळसुंदा गावाजवळ) एकुण निधी – 200 लक्ष