ब्रेकिंग : जामखेड तालुक्यात बिबट्या पुन्हा सक्रीय, जवळ्यात आढळले बिबट्याचे ठसे, शेतकऱ्यांनी घाबरून न जाता सतर्कता बाळगावी – वनविभागाचे अवाहन

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील जवळा येथील सिना नदीच्या काठच्या परिसरातील शेतकऱ्यांना बिबट्या सदृश्य प्राण्याचे दर्शन झाल्याची घटना उघडकीस आली आहे. वनविभागाच्या पथकाने या भागात पाहणी केली असता वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना बिबट्या सदृश्य प्राण्याचे दोन ठसे आढळून आले आहेत. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. शेतकरी बांधवांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे अवाहन जामखेड वनविभागाकडून करण्यात आले आहे.

Leopard active again in Jamkhed taluka, leopard footprints found jawala village, farmers should be alert instead of panic - Forest Department warns

जामखेड तालुक्यातील जवळा येथील सिना नदी काठच्या परिसरात गेल्या दोन दिवसांपासून बिबट्या सदृश्य प्राण्याचे दर्शन शेतकऱ्यांना होत आहे. यामुळे या भागात भितीचे वातावरण पसरले आहे. याआधी जामखेड तालुक्यातील खर्डा परिसरात सातत्याने बिबट्याचे दर्शन होत होते. त्यातच आता जवळा परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

जवळा येथील सिना नदी काठचा परिसरात ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर या भागात वेड्या बाभळींचे मोठे साम्राज्य आहे. हा भाग बिबट्याच्या वास्तव्यास अनुकुल असा भाग आहे. त्यातच दोन दिवसांपासून बिबट्या सदृश्य प्राण्याचे या भागात दर्शन होत असल्याने आपल्या भागात बिबट्या तर आला नाही ना ? अशी भिती आता जवळा येथिल शेतकरी आणि नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.

Leopard active again in Jamkhed taluka, leopard footprints found jawala village, farmers should be alert instead of panic - Forest Department warns

दरम्यान, जवळा परिसरात बिबट्या सदृश्य प्राणी दिसून येत असल्याने जामखेड वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आज जवळा भागाची पाहणी केली. जवळा – करमाळा रोडवर सीना नदीच्या काठावर श्रीकांत शिंदे यांच्या शेतात 17 व 18 सप्टेंबर 2023 या रोजी सायंकाळी बिबट्या सदृश्य प्राणी दिसला होता. वनविभागाकडून या भागाची कसून पाहणी करण्यात आली. यावेळी दोन ठिकाणी बिबट्याचे ठसे आढळून आले आहे. जवळा भागात बिबट्याचे वास्तव असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

Leopard active again in Jamkhed taluka, leopard footprints found jawala village, farmers should be alert instead of panic - Forest Department warns

दरम्यान,  जवळा भागात बिबट्या सदृश्य प्राणी शेतकऱ्यांना वारंवार दिसत असल्याचे माहिती सरपंच प्रशांत शिंदे यांनी वनविभागाला कळवली होती. त्यानुसार कर्जत उपविभागीय वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेडचे वनपाल आर एम भोसले ,वनरक्षक प्रवीण उबाळे, आजिनाथ भोसले, रवी राठोड वन कर्मचारी भाऊसाहेब भूगोल हरिश्चंद्र माळ शिकारे माणिक यांनी संबंधित बिबट प्रवण क्षेत्राची पाहणी केली व नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन केले. तसेच बिबट्यापासून संरक्षण करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना याबाबत त्यांनी शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली.

Leopard active again in Jamkhed taluka, leopard footprints found jawala village, farmers should be alert instead of panic - Forest Department warns

यावेळी जवळा येथील वन विभागातील अधिकारी प्रवीण शिंदे, सामाजिक कार्यकर्ते तानाजी अण्णा पवार, दादा वाळुंजकर, सचिन विटकर तसेच परिसरातील शेतकरी उपस्थित होते.