मतदानाला आला अन् पोलिसांच्या तावडीत सापडला ! (He came to the polls and was caught by the police)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदानास आलेल्या एका फरार आरोपीस शिताफीने पकडण्याची कारवाई जामखेड पोलिसांनी शुक्रवारी पार पाडली अशी माहिती पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना दिली आहे. (He came to the polls and was caught by the police)

जामखेड तालुक्यातील खांडवी गावातील शरद गुलबाशा भोसले याच्याविरोधात जामखेड पोलिस स्टेशनला विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. काही गुन्ह्यात तो जामिनावर तर काही गुन्ह्यात फरार होता. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शरद भोसले हा खांडवीत येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड ( PI SAMBHAJIRAO GAIKWAD) यांना मिळाली होती. त्यानुसार त्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी सापळा लावला होता. शरद भोसले मतदानकेंद्रातून मतदान करून बाहेर पडताच पोलिस पथकाने त्याच्या मुसक्या आवळत त्याला अटक केली.

ही कारवाई पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश जानकर पोलिस काँस्टेबल संग्राम जाधव, आबासाहेब आवारे, संदिप राऊत, अरूण पवार तसेच मतदान केंद्रावरील  पोकॉ.रोहिदास गुंडाळे, होमगार्ड अरुण पोटे खांडवीचे पोलीस पाटील संतोष डिसले यांनी पार पाडली.