By-election campaign in 4 gram panchayats in Jamkhed taluka । जामखेड तालुक्यात 4 ग्रामपंचायतीत पोटनिवडणुकीची रणधुमाळी 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यात पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. तालुक्यातील ४ ग्रामपंचायतींच्या रिक्त पदासाठी निवडणुक आयोगाने निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला आहे अशी माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली. (By-election campaign in 4 gram panchayats in Jamkhed taluka)

जामखेड तालुक्यातील 4 ग्रामपंचायतींच्या 4 जागा रिक्त झाल्या होत्या. जवळा,सावरगाव,नायगाव येथील ग्रामपंचायत सदस्यांचे निधन झाल्याने व आघी येथील पद रिक्त राहिल्याने रिक्त ग्रामपंचायत सदस्य निवडीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.

जाहिर झालेल्या पोटनिवडणुकीच्या निवडणूक प्रक्रियेत दि ३० नोव्हेंबर पासून अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. ६ डिसेंबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे (दिनांक 4 आणि 5 डिसेंबर सुट्टीचे दिवस वगळून) दि ७ डिसेंबर रोजी अर्ज छाननी होईल, तर ९ डिसेंबर रोजी अर्ज माघार व चिन्ह वाटप होईल. २१ डिसेंबर रोजी मतदान , तर २२ रोजी मतमोजणी होणार आहे.

जामखेड तालुक्यातील चार ग्रामपंचायतींमधील रिक्त जागांसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीत जवळा ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ५ मध्ये सर्वसाधारण जागा , सावरगाव ग्रामपंचायतमधील प्रभाग १ मध्ये अनुसूचित जाती, नायगाव ग्रामपंचायतमधील प्रभाग १ मधील सर्वसाधारण जागा आणि आघी येथील प्रभाग ३ मधील अनुसूचित जाती स्त्री  या जागांसाठी निवडणूक होणार आहे.

या निवडणुक प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूका करण्यात आल्या आहेत. या पोटनिवडणुकीसाठी निवडणूकीचे नियोजन महसूल प्रशासनाकडून करण्यात आले आहे.संबंधित गावापुरती आचारसंहिताही निकाल लागेपर्यंत लागू राहणार आहे अशी माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली.