अखेर अरणगावात विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांचे उपोषण सुरू

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । जामखेड तालुक्यातील अरणगाव ग्रामपंचायतचे सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभाराविरोधात तसेच विविध मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात  अंदोलनाचे हत्यार उपसले आहे. सोमवार दि 9 जानेवारी पासून अरणगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचे अंदोलन हाती घेण्यात आले आहे.

Finally, the hunger strike of the villagers along with the Gram Panchayat members started for various demands in Arangaon

जामखेड तालुक्यातील अरणगाव ग्रामपंचायतच्या सदस्या रब्बाना सादिक शेख,रुपाली शंकरराव गदादे, गजराबाई चंद्रकांत पारे, तात्यासाहेब बलभीम निगुडे या ग्रामपंचायत सदस्यांसह राष्ट्रवादीचे नेते संतोष निगुडे, राष्ट्रवादीचे युवा नेते शंकरराव गदादे, सादिक शेख प्रविण मधुकर निगुडे,अंगद निगुडे,धीरज राऊत, रमेश सोनवणे, अंकुश गवळी, देवा निगुडे, राजू नन्नवरे,रवी भोगे, संतोष कोथमिरे, शकुंतला संतोष निगुडे, रामदास गदादे, नवनाथ ससाणे, परमेश्वर निगुडे, अमीर शेख या ग्रामस्थांनी उपोषणास पाठिंबा दिला आहे.

Finally, the hunger strike of the villagers along with the Gram Panchayat members started for various demands in Arangaon

अरणगाव ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांचे खालील मागण्यांसाठी उपोषण सुरु

१. अरणगाव येथील पाणी पुरवठा महिन्याला एकदा होत आहे पाणी पुरवठा पूर्णपणे विस्कळीत आहे तो सुरळीत करण्यात यावा.

२. मागील चार महिन्या पासून सरपंच व ग्रामसेवक मासिक मीटिंग न घेता मनमानी कारभार करत आहेत त्यांची चौकशी लावून कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

३. माहितीचे अधीकार अर्ज देऊन, अपील करून देखील नियमभंग करून माहिती देण्यास ग्रामसेवक टाळाटाळ करत आहेत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

४. मासिक मीटिंग न घेता किंवा कोणत्याही मासिक मीटिंगमध्ये ठराव न घेता बोगस कामे दाखवून ग्रामपंचायतच्या खात्यात रक्कम उचलण्यात आलेली आहे, त्याची चौकशी करुन ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

५. अरणगाव पशु वैद्यकीय अधिकारी कायम गैरहजर असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे, म्हणून त्यांना गाव देऊन कायम हजर राहण्याबाबत आदेश द्यावेत.

६. अरणगाव येथील शासकीय विहिरीवरील गौण खनिज चोरी केल्या बाबत आपल्या कडील तक्रारीची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

७. पारेवाडी स्मशानभूमी येथील गौण खनिज उत्खनन झाल्याचे सिद्ध झालेले आहे व दोषींना तहसीलदार साहेब यांनी दंड देखील अकारलेला आहे, परंतु राजकीय दबावापोटी संबधितांकडून अजून देखील दंड वसूल करण्यात आलेला नाही, तो लवकरात लवकर वसूल करण्यात यावा.

८. अरणगावचे ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभार, सतत गैरहजर, नियमबाह्य काम इत्यादी वेळोवेळी लिखीत तक्रारी करून देखील त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई झालेली नाही, त्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी. या सर्व मागण्यांसाठी अरणगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाचे अंदोलन सुरु आहे.

Finally, the hunger strike of the villagers along with the Gram Panchayat members started for various demands in Arangaon

महसुल विभागाच्या अश्वासनांवर उपोषणकर्ते आणि ग्रामस्थ असमाधानी

दरम्यान उपोषणस्थळी मंडल अधिकारी बाळासाहेब लटके आणि तलाठी सुर्यकांत सरोदे, पोलिस पाटील दत्तात्रय निगुडे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. उपोषणकर्त्यांच्या मागण्यांवर चर्चा केली. पारेवाडी गौण खनिज प्रकरणात दंडाची नोटीस बजावण्यात आलेली आहे, सदर दंड वसुल करण्याबाबत कारवाई सुरु आहे, त्या प्रकरणात लवकरात लवकर दंड वसुल केला जाईल असे लेखी पत्र दिले, मात्र उपोषण कर्त्यांचे समाधान झाले नाही.गट नंबर 147 सरकारी विहिरीवरील खरिप व तलावातील सांडव्यामधील मुरुम उत्खनन बाबत चौकशी करून अहवाल जामखेड तहसिल कार्यालयात सादर केलेला आहे. व त्याबाबत दंडात्मक कारवाई सुरु असे लेखी पत्र दिले. मात्र उपोषणकर्त्यांचे समाधान झालेले नाही.