शितल कलेक्शनच्या पैठणी महोत्सवाला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद, 10 ग्राहक ठरले पैठणीचे भाग्यवान विजेते

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । कर्जत-जामखेडसह मराठवाड्यातील ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या शितल कलेक्शन या कापड दालनात मकर संक्रांतीनिमित्त पैठणी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. 5 जानेवारीपासून या महोत्सवाला सुरुवात झाली आहे. गेल्या पाच दिवसांत 10 ग्राहक पैठणीचे भाग्यवान विजेते ठरले आहेत.महिला ग्राहकांचा पैठणी मोहत्सवाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

जामखेड शहरातील नगररोड परिसरात सागर अंदुरे या युवा उद्योजकाचे शितल कलेक्शन हे वस्त्रदालन आहे. अल्पावधीतच शितल कलेक्शन कर्जत-जामखेड, श्रीगोंदा, करमाळा, आष्टी, भूम, पाटोदा, शिरूर या तालुक्यांसह मराठवाड्यातील ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे. शितल कलेक्शन या कापड दुकानामध्ये मकरसंक्रांती सणानिमित्त निमित्त आयोजित पैठणी महोत्सवात दररोज दोन पैठणी जिंकण्याची संधी ग्राहकांना उपलब्ध झाली आहे.दररोज सायंकाळ लकी ड्राँ पद्धतीने चिठ्ठी काढून पैठणीचे दोन भाग्यवान विजेते जाहीर केले जात आहेत.

शितल कलेक्शनमध्ये 5 ते 15 जानेवारीपर्यंत पैठणी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. फक्त 1100 रूपयांच्या खरेदीवर लकी ड्राॅ कुपन शितल कलेक्शनकडून दिले जात आहे. शितल कलेक्शनने अल्पावधीतच ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. शितल कलेक्शनच्या प्रत्येक महोत्सवाला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. शितल कलेक्शनचे संचालक तथा युवा उद्योजक सागर अंदुरे हे नेहमी ग्राहकांसाठी नवनव्या योजना राबवत असतात. त्यांच्या कल्पक योजना ग्राहकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहेत.

Shital Collection's Paithani Festival Overwhelming Customer Response, 10 Customers Become Lucky Paithani Winners

आजचे भाग्यवान विजेते

आज 9 रोजी पैठणी महोत्सवाचा लकी ड्राॅ संपन्न झाला. यामध्ये मनिषा प्रकाश ढवळे (सावरगाव, जामखेड) व उरणे दीपमाला विवेक (आष्टी) हे दोन भाग्यवान विजेते ठरले. दोन चिमुकल्यांच्या हस्ते हा लकी ड्रॉ काढण्यात आला. यावेळी शितल कलेक्शनचे संचालक सागर अंदुरे, सलिम सय्यद, देविदास पवार, डोके अमोल, मनोज आरेकर, इकबाल शेख, सिराज भाई मणियार, सचिन दगडे, सह आदी उपस्थित होते.

5 जानेवारी ते 9 जानेवारीपर्यंतचे 10 भाग्यवान विजेते खालीलप्रमाणे

1) अप्पा एकनाथ राजगुरू,जामखेड
2) गणेश भोरे,जामखेड
3)  सोनाली अक्षय साळवे
4) मीनाक्षी सरकाळे
5) स्वाती हनुमंत रेपाळ,भूम
6) संदीप डोके लेहनेवाडी
7) शरद नेमाने पिंपळवाडी
8) शितल संतोष पवार झिक्री
9) मनिषा प्रकाश ढवळे सावरगाव
10) उरणे दीपमाला विवेक आष्टी