जामखेड टाइम्स वृत्तसेवा । जामखेड तालुक्यातील बोर्ला (Borla) सेवा संस्थेचे चेअरमन तथा उपसरपंच जालिंदर चव्हाण (Jalinder Chavan) यांनी जामखेड बाजार समिती निवडणूकीत (Jamkhed Bazar Committee Election) भाजपकडून (BJP) उमेदवारी मिळावी यासाठी मोर्चेबांधणी हाती घेतली आहे.पक्षाने निवडणूक लढवण्याचा आदेश दिल्यास मोठ्या ताकदीने निवडणूकीस सामोरे जाऊ, असा मनोदय चव्हाण यांच्याकडून व्यक्त केला जात आहे.
जामखेड बाजार समितीची 18 जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी जामखेड तालुक्यातील मात्तबर नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांचा भरणा अधिक आहे. यंदा होणारी निवडणूक भाजप विरूध्द राष्ट्रवादी अशीच रंगणार आहे. दोन्ही पक्ष तगडे उमेदवार रिंगणात उतरवणार आहेत. भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी आमदार प्रा.राम शिंदे (mla Ram Shinde) यांचे कट्टर समर्थक जालिंदर चव्हाण हे प्रयत्नशील आहेत.चव्हाण यांनी तीन मतदारसंघातून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तीन पैकी एका ठिकाणी उमेदवारी मिळावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
चेअरमन जालिंदर चव्हाण हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपात सक्रीय आहेत.सध्या ते बोर्ला गावचे उपसरपंच तसेच सेवा संस्थेचे चेअरमन आहेत.गावातील महत्वाच्या दोन्ही संस्था त्यांच्या ताब्यात आहेत.सेवा संस्थेत ते चौथ्यांदा तर ग्रामपंचायतीत तीनदा निवडून आले आहेत.नान्नज येथील नंदादेवी स्कुल कमिटीचे सध्या ते अध्यक्ष आहेत.कन्स्ट्रक्शन व्यवसायामुळे त्यांचा मोठा जनसंपर्क आहे.तसेच त्यांचे नातगोतं आणि मित्रपरिवारही तालुक्यात मोठा आहे.या बळावर ते निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी इच्छूक आहेत. पक्षाने उमेदवारी द्यावी यासाठी चेअरमन जालिंदर चव्हाण यांनी मोर्चेबांधणी हाती घेतली आहे.
बाजार समिती निवडणुकीसाठी किती पॅनल होणार ? कोण उमेदवार असणार ? हे अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी (20 एप्रिल रोजी) स्पष्ट होणार आहे.तत्पूर्वी इच्छूक उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास प्रारंभ केला आहे.भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांकडून जोर लावण्यास सुरुवात झाली आहे. बोर्ला गावचे चेअरमन जालिंदर चव्हाण यांनीही उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. आपली उमेदवारी कशी योग्य आहे हे ते अनेकांना पटवून देत आहेत.पक्षाने संधी दिल्यास मोठ्या ताकदीने निवडणुकीला सामोरे जाऊ असाही मनोदय ते यावेळी व्यक्त करताना दिसत आहेत.
कोण आहेत जालिंदर चव्हाण?
नान्नज आणि जवळा या दोन मोठ्या गावांमध्ये वसलेल्या बोर्ला या छोट्या गावातील भाजपा निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून जालिंदर चव्हाण यांची ओळख आहे.गावातील प्रस्थापितांविरुद्ध संघर्ष करून त्यांनी आपला राजकीय प्रवास आजवर सुरू ठेवला.या बळावर ते सेवा संस्थेत चौथ्यांदा तर ग्रामपंचायतीत तीनदा निवडून आले.सध्या गावातील दोन्ही संस्था त्यांच्या ताब्यात आहेत. सेवा संस्थेचे चेअरमन आणि गावचे उपसरपंच म्हणून ते काम पाहत आहेत. गेल्या 15 ते 20 वर्षांपासून आमदार प्रा.राम शिंदे यांचे समर्थक म्हणून ते राजकीय वर्तुळात कार्यरत आहेत.