CM Eknath Shinde : पारनेर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सात दिवसांच्या आत मदत करणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : ९ एप्रिल रोजी पारनेर तालुक्यातील वनकुटे गावात वादळी वारा, गारपीटीसह ढगफुटीसदृश पावसाने झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाहणी केली‌. “एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, युध्दपातळीवर पंचनामे करण्यात येऊन एका आठवड्यात शेतकऱ्यांचा खात्यात मदत वितरित करण्यात येईल.” अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना दिली.

CM Eknath Shinde news today, will help affected farmers within seven days - CM Eknath Shinde, CM Eknath Shinde inspects damage caused by cloudburst-like rain in parner

यावेळी मुख्यमंत्र्यांनी वनकुटे गावातील शेतकरी व ग्रामस्थांशी  संवाद साधला‌. त्यांच्या अडचणी जाणून‌ घेत पडझड झालेल्या घरांची तात्पुरत्या स्वरूपात आजच उभारणी‌ करण्याचे आदेश दिले. वनकुटेमधील २२ कुटुंबांना शबरी घरकुल योजनेमधून तात्काळ पक्के घरकुले उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. त्यांच्यासमवेत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, खासदार सदाशिवराव लोखंडे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित होते.

अवकाळी पावसाने वनकुटे गावातील घरांची पडझड झाली आहे.कांदा, कलिंगड, टोमॅटो, उन्हाळी भुईमूग या पिकांसह मका, कडवळ, घास ही चारा पिके जमीनदोस्त झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गावाजवळील हिरामण बन्सी बर्डे, कचरू विठ्ठल वाघ यांच्या पडझड झालेल्या घरांची पाहणी केली.‌ त्यांच्याशी आस्थेवाईकपणे संवाद साधला. त्यानंतर शेतकरी बबनराव रामभाऊ काळे, भागा पायगुडे, बबन मुसळे व बाबाजी मुसळे यांच्या शेतीमधील कांदा, मिरची यासह डाळिंब, संत्रा, आंबे, या फळपिकांच्या नुकसानीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहाणी करून झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली.

CM Eknath Shinde news today, will help affected farmers within seven days - CM Eknath Shinde, CM Eknath Shinde inspects damage caused by cloudburst-like rain in parner

वनकुटे ग्रामदैवत मंदीरात शेतकऱ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, हे सरकार सर्वसामान्य शेतकऱ्यांचे आहे.त्यांच्या घामाची व दुःखाची जाण शासनाला आहे‌. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे. सतत पाच दिवस १० मिलीमीटर पर्यंत पडणारा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती म्हणून समजण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतला आहे‌.

CM Eknath Shinde news today, will help affected farmers within seven days - CM Eknath Shinde, CM Eknath Shinde inspects damage caused by cloudburst-like rain in parner

नमो शेतकरी सन्मान योजनेत आता शेतकऱ्यांना वार्षिक १२ हजारांची मदत देण्यात येत आहे. एक रूपयांत  पीक विमा काढण्यात येत आहे ‌. नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत १० हजार कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे.यापुढेही मदत देण्यात येईल.

CM Eknath Shinde news today, will help affected farmers within seven days - CM Eknath Shinde, CM Eknath Shinde inspects damage caused by cloudburst-like rain in parner

तातडीने पंचनामे करण्याचे काम प्रशासनाने करावे. कांदा पीकांची सातबारा वर नोंद नसली तरी पंचनाम्यात नोंद घेऊन नुकसान भरपाई देण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी प्रशासनास दिल्या.

CM Eknath Shinde news today, will help affected farmers within seven days - CM Eknath Shinde, CM Eknath Shinde inspects damage caused by cloudburst-like rain in parner

यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबातील दोघांना प्रत्येकी १० किलो गहू व तांदळाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी वाटप करण्यात आले. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी ही यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

CM Eknath Shinde news today, will help affected farmers within seven days - CM Eknath Shinde, CM Eknath Shinde inspects damage caused by cloudburst-like rain in parner