Ashadhi Wari 2023 : श्रीराम देवस्थानच्या दिंडीची मुस्लिम बांधवांकडून सेवा, जामखेड तालुक्यात घडले हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे दर्शन

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सत्तार शेख। Ashadhi Wari 2023 : समतेचा, मानवतेचा, बंधुत्वाचा, सेवा कार्याचा, ऐकोप्याचा संदेश देणाऱ्या आषाढी वारीचे ठिकठिकाणी भक्तिमय वातावरणात स्वागत होत आहे. जात धर्म पंथाच्या बेड्या तोडून अवघा महाराष्ट्र वारकऱ्यांच्या सेवेत रममाण झाला आहे.यात मुस्लिम समाजही मागे नाही. राज्यात मुस्लिम समाजाकडून वारीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. त्याचबरोबर वारकऱ्यांची सेवा देखील केली जात आहे.अशी एक घटना जामखेड तालुक्यातून समोर आली आहे.

Ashadhi Wari 2023, Dindi of Sriram Devasthan Trust was served by jawalaa Muslim brothers,Vision of Hindu-Muslim brotherhood in Jamkhed taluka

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व धार्मिक परंपरेतील महत्वाचं सोनेरी पान असलेल्या आषाढी वारीचा उत्साह संबंध महाराष्ट्रभर शिगेला पोहचला आहे.राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकऱ्यांचे जथ्थेच्या जथ्थे पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरीच्या दिशेने निघाले आहेत. गुरूवारी तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे दर्शन घडल्यानंतर शुक्रवारी जामखेड तालुक्यात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे दर्शन घडले आहे. जवळा येथील मुस्लिम बांधवांनी श्रीराम देवस्थान ट्रस्टच्या दिंडीचे स्वागत केले. मस्जिदमध्ये चहा नाश्त्याची सोय करत त्यांनी वारकरी बांधवांची सेवा केली.

Ashadhi Wari 2023, Dindi of Sriram Devasthan Trust was served by jawalaa Muslim brothers,Vision of Hindu-Muslim brotherhood in Jamkhed taluka

जामखेड तालुक्यातील सरदवाडी येथील श्री क्षेत्र श्रीराम देवस्थान ट्रस्टच्या वतीने सरदवाडी ते पंढरपूर पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे.ह.भ.प तेजेराव महाराज कात्रजकार व ह.भ.प बाळासाहेब महाराज गाडे यांच्या नेतृत्वाखालील हि दिंडी पंढरीच्या दिशेने निघाली आहे. या दिंडीत शेकडो महिला पुरूष वारकरी सहभागी झाले आहेत.

Ashadhi Wari 2023, Dindi of Sriram Devasthan Trust was served by jawalaa Muslim brothers,Vision of Hindu-Muslim brotherhood in Jamkhed taluka

सदर दिंडीचे नान्नज, बोर्लेमार्गे जवळा या ठिकाणी आज आगमन झाले. यावेळी जवळा गावातील सर्व मुस्लिम बांधवांनी एकत्रित येत दिंडीचे स्वागत केले. मस्जिदच्या आवारात वारकऱ्यांसाठी चहा नाश्त्याची सोय करण्यात आली होती. यावेळी मुस्लिम बांधवांनी केलेल्या सेवेने वारकरी बांधव भारावून गेले होते.

Ashadhi Wari 2023, Dindi of Sriram Devasthan Trust was served by jawalaa Muslim brothers,Vision of Hindu-Muslim brotherhood in Jamkhed taluka

दरम्यान, या वर्षीप्रमाणेच दरवर्षी श्रीराम देवस्थान ट्रस्टच्या दिंडीची सेवा करण्याचा निर्णय यावेळी मुस्लिम बांधवांनी घेतला. यावर्षी प्रमाणे दरवर्षी आमची सेवा स्वीकारावी अशी विनंती मुस्लिम बांधवांनी करताच वारकरी बांधव व दिंडी चालकांनी त्यास होकार दिला. जवळा गावातील मुस्लिम बांधवांनी प्रभू श्रीरामाच्या दिंडीची केलेली सेवा तालुक्यात चर्चेत आली आहे.