Sarfaraz Khan ICC Ranking : आयसीसी टाॅप 100 खेळाडूंच्या रँकिंगमध्ये सरफराज खानची दिमाखात एन्ट्री, सरफराज खान व ध्रुव जुरेल कितव्या स्थानी ? जाणून घ्या !
Sarfaraz Khan ICC Ranking : बीसीसीआयकडून देशात खेळवल्या जाणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण दमदार कामगिरी करणाऱ्या युवा फलंदाज सरफराज खानचे भारतीय संघात आगमन (Sarfaraz Khan test debut) व्हावे ही त्याच्या चाहत्यांची प्रतिक्षा अखेर संपली.भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी सज्ज असलेल्या सरफराज खानचे (Sarfaraz Khan england test )इंग्लंड विरूध्द राजकोट येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीत पदार्पण झाले. पदार्पणात त्याने दोन अर्धशतके झळकावून आपली निवड सार्थ ठरवली.याच खेळीच्या बळावर सरफराज खानने आयसीसीच्या क्रमवारीत स्थान मिळवण्याची किमया केली आहे.
भारतीय संघात पदार्पण केल्यानंतर दोन्ही डावांत सलग अर्धशतक ठोकण्याचा पराक्रम सरफराज खानने राजकोट कसोटीत केला. असा पराक्रम करणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे. सरफराज खानने (Sarfaraz Khan ICC Ranking)कसोटी संघात पदार्पण करताच त्याने आयसीसीच्या क्रमवारीत स्थान मिळवले. सरफराज खान व ध्रुव जुरेल या दोघा नवोदित खेळाडूंनी आयसीसीच्या टाॅप 100 खेळाडूंच्या यादीत समावेश झाला आहे.
राजकोट येथे इंग्लंड विरूध्द खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताकडून सरफराज खानचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आगमन झाले. या सामन्यात भारताकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना सरफराज खान याने आक्रमक अर्धशतक झळकावले. त्याने या डावांत 9 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 62 धावा केल्या. तो शतक झळकावणार असे वाटत असतानाच रविंद्र जडेजाच्या चुकीच्या काॅलमुळे तो धावबाद झाला. सरफराज खान बाद झाला हा क्षण सर्वांनाच हुरहूर लावून गेला.
भारतीय संघ दुसर्या डावांत फलंदाजीस आल्यानंतर सरफराज खान याने यशस्वी जैस्वाल सोबत दमदार भागीदारी केली. त्याने या डावांत 6 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने 68 धावा केल्या. सरफराजचे शतक होण्या आधीच भारताने आपला दुसरा डाव घोषित केला. राजकोट कसोटीत भारताने इंग्लंडवर मोठा विजय मिळवला.भारताच्या या विजयात सरफराज खानच्या दोन्ही डावांत खेळलेल्या खेळींचा महत्त्वपूर्ण वाटा राहिला आहे. कसोटीत पदार्पणात दोन अर्धशतक आणि भारताचा इंग्लंड विरूध्द सर्वात मोठा कसोटी विजय हे सरफराज खानच्या पुढील वाटचालीस बळ देणारे ठरले आहे.
आयसीसीने टाॅप 100 खेळाडूंची रँकिंग जाहिर केली आहे. (Sarfaraz Khan ICC Ranking) या यादीत सरफराज खानने 75 वे स्थान पटकावले आहे. त्याचे रेटिंग 419 आहे. त्याचबरोबर ध्रुव जुरेलने 100व्या स्थानावर प्रवेश केला आहे. सरफराज खानने रविंद्र आश्विन याला या यादीत मागे टाकले आहे. आश्विन या यादीत 394 रेटींग मिळवून 80 व्या स्थानी आहे. आश्विनसह मार्को जॅनसेन, रचिन रविंद्र, तेज नारायण चंद्रपाॅल यांनाही सरफराज खानने मागे टाकले आहे.आयसीसीकडून जाहीर होणाऱ्या या यादीत जगभरातील दिग्गज खेळाडूंचा समावेश असतो, याच यादीत सरफराज खान व ध्रुव जुरेलने कसोटी पदार्पणातच स्थान मिळवले आहे.