पोलीस भरती संदर्भात मोठी बातमी : राज्यात लवकरच होणार 7 हजार पदांची पोलीस भरती

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या राज्यातील लाखो तरुणांसाठी राज्य सरकारने एक आनंदाची बातमी दिली आहे. राज्यात लवकरच पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. तश्या जोरदार हालचाली सरकारकडून सुरू झाले आहेत यामुळे राज्यातील तरुण वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

भरती प्रक्रियेत कुठलाही घोटाळा होऊ नये यासाठी राज्य सरकारच्या गृह विभागाकडून लवकरच सात हजार पदांची पोलीस कॉन्स्टेबल भरती घेतली जाणार आहे. सात हजार पदांची भरती प्रक्रिया पार पडल्यानंतर 10000 पोलीस शिपाई पदांची भरती प्रक्रिया सरकारकडून राबवली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून माहिती मिळत आहे.

गेल्या दोन वर्षापासून देशासह राज्यात कोरोनाच्या संकटामुळे नोकरभरतीची प्रक्रिया थांबली होती. कोरोनाचा पोलीस भरती प्रक्रियेला फटका बसल्याने आवश्यकता असताना देखील राज्यात पोलीस कर्मचाऱ्यांची भरती होऊ शकली नाही. राज्याची लोकसंख्या लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर पोलीस बळाची गरज आहे. आता त्यामुळे राज्य सरकाराने सुरू केलेल्या हालचालीमुळे पोलीस भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

वर्षातून एकदा पोलीस भरती होत असते. पोलीस दलात आपले कर्तव्य बजावण्याचे कित्येकांचे स्वप्न असतं आणि हेच स्वप्न उराशी बाळगून वर्षभर ही लोकं तयारीला लागतात. पोलीस दलात सेवा बजावण्याचे यांचे स्वप्न असतं. ते पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असतात. अशा तरूणांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.