निवडणूक संपली…निकाल लागला…आणि जवळ्याच्या शेतकरी विकास आघाडीच्या उपक्रमाची राज्यात चर्चा

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । निवडणुका म्हटल्या की, जेवणावळी आणि दारूचा महापूर आलाच, निकाल लागला की मग मतदारांना विसरले जाते,मात्र जामखेड तालुक्यातील जवळा येथे नुकतीच पार पडलेली जवळा सोसायटीची निवडणूक याला अपवाद ठरली, या निवडणुकीत शेतकरी विकास आघाडीने निवडणूक निकालानंतर गाव जेवण देत नव्या राजकीय परंपरेची मुहूर्तमेढ रोवली तसेच ग्रामदैवत जवळेश्वराने विजयी कौल दिल्याचीही नवसपुर्ती जवळेश्वर चरणी केली. शेतकरी विकास आघाडीच्या या उपक्रमाची राज्यात जोरदार चर्चा होत आहे.

कार्यकर्ते आणि नेत्यांच्या अवती भवती कोणतीही निवडणूक फिरत असते,त्यामुळे निवडणुकीत सर्व सामान्य माणसांचा सक्रीय सहभाग नसतो, निवडणूक काळात जो काही फायदा व्हायचा तो कार्यकर्त्यांचाच होतो, या सर्व गोष्टीत मतदारराजा मात्र दुर्लक्षित राहतो. याच गोष्टींचा विचार करून शेतकरी विकास आघाडीने  जवळा सोसायटीचा निकाल लागताच, गाव जेवण कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

आपल्या विजयात संपुर्ण गावाला सामिल करून घेतले, जवळा आणि जामखेड तालुक्याच्या राजकीय पटावर ही घटना नाविन्यपूर्ण ठरली आहे. निवडणूक काळात निर्माण झालेली राजकीय कटुता दुर करण्यासाठी निकालानंतर विजयी पॅनलने गाव जेवण घालून नवा राजकीय आदर्श निर्माण करणे आवश्यक आहे. यातून गावोगावी निर्माण झालेले राजकीय हाडवैर दुर होईल प्रगल्भ राजकीय वातावरण निर्माण होण्यास मदत होईल. जवळा ग्रामस्थांनी घालून दिलेला आदर्श राज्यातील राजकारण्यांनी अनुकरण करावा असाच आहे.

ऐरवी निवडणूक काळापुरतेच मतदारांच्या पायघड्या घातल्या जातात, मात्र शेतकरी विकास आघाडीने निकालानंतर मतदारांसह संपुर्ण गावाला विजयात सामिल करून घेतले, शेतकरी विकास आघाडीने  ग्रामदैवत जवळेश्वरास घातलेले विजयाचे साकडे जवळेश्वराने विजयी कौल देत पुर्ण झाले. जवळेश्वर मंदिरासमोर परिसरात शेतकरी विकास आघाडीने आयोजित केलेल्या गाव जेवण कार्यक्रमाचा संपुर्ण गावाने लाभ घेतला, या कार्यक्रमात महिलांची उपस्थित मोठी होती.

यावेळी चेअरमन शहाजी (आप्पा) पाटील, व्हाईस चेअरमन शिवाजी हजारे, शेतकरी विकास आघाडीचे नेते अजिनाथ हजारे, दीपक पाटील, दशरथ हजारे, राजेंद्र पवार,प्रशांत पाटील, राजेंद्र राऊत, संतराम सुळ, डाॅ दीपक वाळूंजकर, अशोक पठाडे, नवनाथ पोपट बारस्कर, राजेंद्र रामचंद्र हजारे, अविनाश काकासाहेब लेकुरवाळे, काशिनाथ गहिनीनाथ मते, चंद्रहार किसन पागिरे,अरूण नामदेव रोडे, कैलास महादेव वाळुंजकर, आयोध्या रामलिंग हजारे, सायरा सत्तार शेख, मच्छिंद्र मारूती सुळ, रूपचंद तुकाराम अव्हाड उपस्थित