जामखेड टाईम्सचे नवे पाऊल !

जामखेड तालुक्यातील तमाम जनतेस जामखेड टाईम्सच्या वतीने नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!

सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं
मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए

जामखेडच्या मातीचा दैदिप्यमान वारसा आणि उन्नत विचारधारा अंगी बाणवत कणखर,निर्भिड,रोखठोक भूमिका घेऊन जामखेडकरांचा हक्काचा आवाज दररोज मांडण्यासाठी आम्ही सात महिन्यांपुर्वी “जामखेड टाईम्स” या न्यूज चॅनलची जामखेडच्या मातीत मुहूर्तमेढ रोवली. सात महिन्यांचा हा प्रवास तसा प्रचंड संघर्षाचा राहिला पण आम्ही बातमीशी प्रामाणिक राहिलो. महत्वाच्या बातम्या आपणापर्यंत अचूकपणे मांडण्याचा प्रयत्न केला. जनतेपर्यंत थेट बातमी पोहचवण्यावर आम्ही काम करत राहिलो.जनतेनेही आमच्या पत्रकारितेला उदंड प्रतिसाद दिला.

अवघ्या सात महिन्यांत तब्बल दहा लाखांपेक्षा अधिक प्रेक्षकांनी जामखेड टाईम्स न्यूज चॅनलवर विश्वास दाखवला. अनेक ज्ञात अज्ञात हितचिंतकांनी जामखेड टाईम्सचे रोपटे वाढवण्यासाठी मेहनत घेतली. म्हणूनच जामखेड टाईम्सने सर्व रेकाॅर्ड मोडत अल्पावधीतच सात हजारापेक्षा अधिक सबस्क्राईबर्सचा टप्पा ओलांडला.यातुनच जामखेड टाईम्स बनले जामखेड तालुक्यातील नंबरवन न्यूज चॅनल !

जामखेड टाईम्सच्या टिमने आता आपणा सर्वांच्या पाठबळावर 01 जानेवारी 2021 अर्थात आजपासुन जामखेडच्या पत्रकारितेत आणखीन एक नवे पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून आपणा सर्वांच्या आशिर्वादासह पाठबळावर जामखेडकरांच्या सेवेत आम्ही घेऊन येत आहोत www.jamkhedtimes.com ही न्यूज वेबसाईट.

उपलब्ध असलेल्या तुटपुंज्या संसाधनावर जामखेड टाईम्सने आपली आजवरची वाटचाल सुरू ठेवली आहे.अडचणी अनेक आहेत पण आपणा सर्वांच्या पाठबळामुळे त्यावर मात करत मार्गक्रमण सुरू आहे.जामखेड तालुक्यातील प्रत्येक गावांत, वाडीवस्तीवर घडणारी घटना मग ती छोटी असो की मोठी ती जनतेपर्यंत अर्थात जगाच्या कानाकोपऱ्यात घेऊन जाण्यासाठी आम्ही आता सज्ज झालो आहोत.

“कोणतीही बातमी छोटी नसते कारण ती तुमच्या आमच्यासाठी महत्वाची असते” म्हणूनच TRP च्या दुनियेत कुणाचेही लांगुनचालन न करता स्वतंत्र पत्रकारितेचा प्रयोग आम्ही न्यूज चॅनलच्या माध्यमांतुन  यापुर्वी करतच होतो आता न्यूज वेबसाईटच्या माध्यमांतुनही यापुढे करत राहणार आहोत.

आजपासुन जामखेड टाईम्स न्यूज वेबसाईटच्या माध्यमांतुन जामखेड तालुक्यात घडणाऱ्या प्रत्येक घडमोडींसह राज्यातील महत्वाच्या बातम्यांचे अपडेट आपल्यापर्यंत रोज पोहचवत राहणार आहे. चला तर मग आपण दररोज भेटत राहू जामखेड टाईम्स न्यूज चॅनल व न्यूज वेबसाईटच्या माध्यमांतुन.

नेहमीप्रमाणे आपणा सर्वांचे उदंड पाठबळ, प्रेम व आशिर्वाद जामखेड टाईम्सच्या पाठीशी  राहिल यात शंकाच नाही !

धन्यवाद!

मुख्यसंपादक
सत्तार शेख, 9960105007