राज्यपालांच्या आदेशाविरुद्ध शिवसेनेची सुप्रीम कोर्टात धाव, आजच होणार सुनावणी

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । राज्यातील सत्तासंघर्षात रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. यात मंगळवारी रात्री भाजपची अधिकृत एन्ट्री झाली. राज्यपालांनी लागलीच ठाकरे सरकारला बहुमत सिध्द करण्याचे आदेश दिले. या आदेशाविरुद्ध ठाकरे सरकारने अर्थात शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. (Shiv Sena runs in Supreme Court against Governor’s order, hearing to be held today)

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्याबाबतचे पत्र मुख्यमंत्र्यांसह राज्याच्या मुख्य सचिवांना पाठवले आहे. या आदेशाविरुद्ध शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.

माझे कुटुंब माझी जबाबदारी बाकी सर्व गुवाहाटी, भाजपचे आमदार राम शिंदेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा !

शिवसेनेने राज्यपालांचे आदेेश येताच सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. शिवसेनेकडून अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तीवाद केला,तातडीनं बहुमत चाचणी घेण्याचे राज्यपालांचे आदेश बेकायदेशीर आहे. यानंतर दोन्ही न्यायाधीशांनी आपापसात चर्चा केल्यावर कागदपत्रांची मागणी केली. आज चार वाजेपर्यंत कागदपत्रांची पूर्तता करु, असं सिंघवी यांनी म्हटलं.

यावर शिंदे गटाकडून वकील जस्टीस सूर्यकांत यांनी आजच या प्रकरणी सुनावणी होईल. दुपारी तीन वाजेपर्यंत कागदपत्रं तयार ठेवा, असं कोर्टानं म्हटलं आहे. संध्याकाळी पाच वाजता यावर सुनावणी होईल, असंही कोर्टानं म्हटलं आहे.

महाधिवक्ता काय म्हणाले?

राज्यपालांची बाजू मांडणारे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सदर प्रकरण कोर्टाने पटलावर घेण्यासाठी संमती दर्शवली. राज्यपालांचा हा विशेषाधिकार असून सदर याचिकेसंबंधीची कागदपत्र कोर्टात हजर केली जातील, असे ते म्हणाले.

अहमदनगर जिल्ह्यात ११ जूलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी

न्यायमूर्ती कांत काय म्हणाले?

शिवसेनेच्या वकिलांनी केलेल्या याचिकेला उत्तर देताना न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले, तुमच्या याचिकेबाबत आम्ही सहमत असू किंवा नसू , मात्र प्रकरणाची गरज पाहता आजच सुनावणी घेऊ. सध्या तरी यासंबंधीच्या याचिकेवर आम्ही संध्याकाळी 5 वाजता सुनावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणातील आजची सर्वात मोठी बातमी : भाजपने केली बहुमत सिद्ध करण्याची मागणी

बंडखोर आमदार उद्या मुंबईत परतणार

दरम्यान राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देताच बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधत आम्ही उद्या मुंबईत येत आहोत अशी घोषणा केली. तत्पूर्वी सर्व बंडखोर आमदार आज गोव्यात दाखल होणार आहेत अशी माहिती समोर येत आहे.