महाराष्ट्र झुकेगा नही :  लवकरच बाप बेटे तुरूंगात  : संजय राऊतांचे ट्विट

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : महाराष्ट्रात भाजप विरूध्द महाविकास आघाडी हा संघर्ष शिगेला पोहचला आहे. राज्यात रोज आरोप प्रत्यारोपांचा धुराळा उडत आहे. ऐकमेकांविरोधात चिखलफेक होत आहे. प्रकरणे उकरून काढली जात आहे. केंद्रीय संस्थांच्या मदतीने भाजप महाविकास आघाडीच्या नेत्यांना अडचणीत आणत आहे. या सर्व घडामोडीनंतर शिवसेनाही आता आक्रमक झाल्याचे दिसू लागले आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा एक ट्विट करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. बाप बेट्यांबरोबरच तीन वसुली एजंट तुरूंगात जातील असे त्यांनी म्हटले आहे. ते दोन बाप बेटे कोण ? याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. कोण म्हणतयं सोमय्या पिता पुत्र असतील तर कोण म्हणतयं राणे पिता पुत्र संजय राऊतांच्या रडारवर असतील. राऊतांच्या ट्विटमुळे लवकरच काहीतरी मोठी घडामोड होणार याचे संकेत मिळत आहेत.

शिवसेना आणि महाराष्ट्र कुणापुढे झळकणार नाही असा थेट इशारा संजय राऊत यांनी ट्विट करत दिला आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, माझे शब्द लक्षात ठेवा, मी पुन्हा एकदा सांगतोय, बाप बेटे जेल जायेंगे,  आणि खात्री बाळगा, बाप आणि बेटा व्यतिरिक्त, 3 केंद्रीय एजन्सी अधिकारी आणि त्यांचे “वसुली एजंट” देखील तुरुंगात जातील. असे सांगत खुबी उडवून दिली आहे.

राऊतांच्या रडारवर राणे पिता पुत्र की सोमय्या पिता पुत्र ?

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून किरीट सोमय्या आणि राणे पिता पुत्र सातत्याने शिवसेनेविरोधात सातत्याने टीका टिप्पणी तसेच भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत आहेत. याला उत्तर देण्यासाठी शिवसेना आक्रमक झाल्याचे दिसत आहे.

आक्रमक झालेली शिवसेना  राणे आणि सोमय्यांना कोणता धडा शिकवणार ? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अश्यातच संजय राऊत यांनी आज एक ट्विट करत बाप बेटे जेलमध्ये जाणार असल्याचे ठणकावले. राणे पिता पुत्र की सोमय्या पिता पुत्र जेलमध्ये जाणार याबाबत आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.