युक्रेन झाला युरोपियन संघाचा सदस्य; EU संसदेची मंजुरी

युक्रेन : गेल्या सहा दिवसांपासून रशियाने युक्रेनमध्ये घुसखोरी करत सुरू केलेले युध्द थांबायचे नाव घेत नसल्याचे दिसत आहे. रशियन सैन्याचा युक्रेनियन सैन्य कडवा प्रतिकार करत आहेत. अश्यातच एक मोठी घडामोड समोर आली आहे. युक्रेन संदर्भात EU संसदेने मोठा निर्णय घेतला आहे. (Ukraine becomes a member of the European Union; EU Parliament approves)

युरोपियन युनियनचे सदस्यत्व युक्रेनला मिळावे यासाठी युक्रेनने केलेल्या अर्जावर युरोपियन युनियन संसदेत आज मोठी घडामोड पहायला मिळाली. EU संसदेने युक्रेनला युरोपियन संघाचे सदस्यत्व बहाल करण्याचा निर्णय घेतला आहे. आता रशिया विरूध्द युरोपियन युनियन असा थेट सामना रंगताना दिसू शकतो. जगावर मोठ्या युध्दाचे ढग आता घोंगावू लागले आहेत.

युरोपियन युनियनने युक्रेनला सदस्यत्व बहाल करून युक्रेनला मोठे बळ दिले आहे. EU संसदेच्या या निर्णयामुळे रशिया काय भूमिका घेणार याकडे संपुर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या शांतता चर्चेत कोणाचा तोडगा निघालेला नाही.रशियाने पाचव्या दिवशी 56 राॅकेट आणि 113 क्रुझ क्षेपणास्त्र डागत युक्रेनमध्ये मोठा विनाश घडवला आहे. रशियाचे आक्रमक वेगात सुरू आहे. रशियाने युक्रेनमधील मारियोपोल शहरावर ताबा मिळवला आहे.

दरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले की, आम्ही स्वातंत्र्याची लढाई लढत आहोत, आमच्यासाठी,प्रत्येक युक्रेन नागरिकांसाठी ही वाईट घटना आहे असे ते म्हणाले, आमचा लढा सुरूच राहील. युक्रेनचे नागरिक रशियन हल्ल्याची किंमत मोजत आहेत.आमच्या स्वातंत्र्याच्या या लढ्याला सर्व देशांकडून पाठिंबा मिळत आहे असे ते युरोपियन संसदेत बोलताना म्हणाले.