जामखेड टाइम्स वृत्तसेवा : विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या 23 रोजी आहे. कर्जत-जामखेडमध्ये हाय होल्टेज ड्राम्यास सुरूवात झाली आहे. गुरूवारी रात्री EVM स्ट्रॉग रूम बाहेर रोहित पवारांचे कर्मचारी खाकी (पोलिसी) वेशात आढळून आल्याने कर्जतमध्ये मोठा राडा झाला. याप्रकरणी कर्जत पोलिसांत तीन वेगवेगळ्या फिर्यादी दाखल झाल्या आहेत. यावरून राजकारण चांगलेच तापले आहे.
या प्रकरणात भाजपला दोषी ठरवण्यासाठी रोहित पवारांकडून सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली. या पोस्टला भाजपा जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांनी सडेतोड उत्तर देत रोहित पवारांच्या दाव्याची पोलखोल केली आणि रोहित पवारांचा खरा चेहरा जनतेसमोर उघड केला. त्यानंतर पोटरे यांनी शुक्रवारी निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी केली आहे.
भाजपा जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांना एक पत्र लिहले आहे, त्यात म्हटले आहे की, आ. रोहित पवार यांनी काल रात्री दिनांक 21/11/2024 रोजी त्यांनीच केलेल्या एका गैरप्रकाराबाबत खोटी पोस्ट केली असून यामुळे प्रशासनाची, मतदारसंघाची व महाराष्ट्राची दिशाभूल व फसवणूक होत आहे. सोशल मीडिया वर आ. पवार यांनी खोटी पोस्ट करून रडीचा डाव खेळला आहे. त्याचा खरा वृत्तांत असा…
काल रात्री 11: 30 वाजता भाजपा चे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना अशी माहिती मिळाली की, मतदान पेट्या जिथे ठेवल्या आहेत त्या स्ट्रॉग रूम परिसरात बारामती ऍग्रो चे काही कर्मचारी पोलिसांच्या वेशात स्ट्रॉग रूमच्या गेटमध्ये व आसपास वावरत आहेत. ते पोलीस कर्मचाऱ्यांसोबत बसले आहेत त्यांच्याकडे अत्याधुनिक मोबाईल व इलेक्ट्रॉनिक यंत्रे आहेत त्याद्वारे ते मतदान यंत्राशी छेडछाड करण्याची श्यक्यता असल्यामुळे सर्व पदाधिकारी तेथे पोहचले.
सर्वांनी त्या कर्मचाऱ्यांची खडसावून विचारपूस केली असता ते बारामती ऍग्रोचे कर्मचारी असल्याचे आमच्या निदर्शनास आले. या कर्मचाऱ्यांनी पोलीस गणवेश परिधान केला होता. पोलिसांच्या वेशातून त्यांचा मतदान यंत्रात छेडछाड करण्याचा कुटील डाव होता तो डाव कार्यकर्त्यांनी हाणून पाडला.
बारामती ऍग्रोच्या कर्मचाऱ्यांना गेटच्या आता येण्याची व येथे थांबण्याची परवानगी कशी याचा जाब पोलिसांना विचारला असता भाजपा कार्यकर्त्यावर व इतर ग्रामस्थांवर स्ट्रॉग रूममध्ये घुसण्याचा खोटा आरोप सोशल मीडियावर आ. रोहित पवार करत आहेत. व पोलीस प्रशासनावर दबाव तंत्राचा वापर करुन खोटा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडलेले आहे.
परंतु वास्तवीक पाहता त्यांनीच गैरप्रकार करण्याच्या उद्देशाने बारामती अॅग्रोचे कर्मचारी, पोलीस प्रशासनाच्या वेशात सदर ठिकाणी थांबवले होते. हा सदरील प्रकार व्हिडिवोच्या माध्यमातुन सिद्ध होतो आहे. या प्रकरणाची प्रशासनाने गंभीर दखल घेवुन स्ट्राँग रुमच्या सुरक्षेची योग्य ती काळजी घ्यावी व तात्काळ त्या ठिकाणी मोबाईल जॅमर बसविण्यात यावेत अन्यथा होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील, असे निवेदनात म्हटले आहे.
स्ट्राँग रुमच्या बाहेर रोहित पवारांचे कर्मचारी पोलिसी वेशात आढळल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांना जाब विचारला. याबाबतचा व्हिडीओ भाजपने जारी केला आहे. त्यानंतर सचिन पोटरे यांनी माध्यमांशी संवाद साधत रोहित पवारांचा जोरदार समाचार घेतला आहे.