Ram Shinde News : आमदार राम शिंदे ठरले सर्वाधिक मते घेऊन सर्वात कमी फरकाने पराभूत झालेले राज्यातील क्रमांक एकचे उमेदवार

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या वादळात महाविकास आघाडी पार भुईसपाट झाली. महायुतीने एकहाती वर्चस्व राखत 230 पेक्षा अधिक जागा जिंकल्या. तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात आमदार प्रा राम शिंदे यांनी पवार घराण्यातील रोहित पवाररूपी बलाढ्य धनशक्तीविरोधात कडवी झुंज दिली. परंतू शेवटच्या फेरीत त्यांचा निसटता पराभव झाला. प्रा.राम शिंदे यांनी दिलेली झुंजार लढत राज्यात चर्चेत आली आहे. सर्वाधिक मते घेऊन सर्वात कमी फरकाने पराभूत होणारे आमदार प्रा राम शिंदे हे राज्यातील क्रमांक एकचे उमेदवार ठरले आहेत.

Ram Shinde News , MLA Ram Shinde became the only candidate in the maharashtra who got the highest number of votes and lost by the smallest margin,  maharashtra Vidhan Sabha Election Results 2024,

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचा 23 रोजी निकाल लागला. या निवडणुकीत सर्वांनाच धक्का देणारा निकाल राज्यातील जनतेने दिला. जनतेने महायुतीच्या हाती स्पष्ट बहुमत सोपवले तर विरोधी महाविकास आघाडीची धूळधाण उडवून दिली. या निवडणुकीत अनेक दिग्गज अश्या मातब्बर नेत्यांना जनतेने पराभूत केले. या सर्वांच्या पराभवापेक्षा भाजपाचे उमेदवार आमदार प्रा.राम शिंदे यांच्या पराभवाची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सर्वाधिक रंगली आहे. कारण त्यांचा अवघ्या १२४३ मतांनी निसटता पराभव झाला. त्यांनी या निवडणुकीत १ लाख २६ हजार ४३३ इतके मते घेतली. राज्यात सर्वाधिक मते घेऊन चौथ्या क्रमांकाचे पराजित झालेले तसेच सर्वाधिक मते घेऊन सर्वात कमी फरकाने पराजित झालेले राम शिंदे हे क्रमांक एकचे उमेदवार ठरले आहेत.

विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेड, करवीर, सिल्लोड व वडगाव शेरी या चार मतदारसंघातील निकाल राज्याचे लक्ष वेधून घेणारे ठरले आहेत. या मतदारसंघातील पराभूत उमेदवारांचा सर्वाधिक मते घेऊन सर्वात कमी फरकाने पराजय झाला. यामध्ये पहिल्या क्रमांकावर कर्जत-जामखेडचे उमेदवार आमदार प्रा.राम शिंदे यांचा समावेश आहे. त्यांनी या निवडणुकीत १ लाख २६ हजार ४३३ इतके मते घेतली. त्यांचा अवघ्या १२४३ मतांनी निसटता पराभव झाला.

Ram Shinde News , MLA Ram Shinde became the only candidate in the maharashtra who got the highest number of votes and lost by the smallest margin,  maharashtra Vidhan Sabha Election Results 2024,

त्यानंतर करवीर मतदारसंघातील उमेदवार राहूल पी.एन. पाटील यांचा १९७६ मतांनी पराभव झाला. त्यांनी या निवडणुकीत १ लाख ३२ हजार ५५२ मते घेतली. सिल्लोड मतदारसंघातील उमेदवार सुरेश बनकर यांचा २४२० मतांनी पराभव झाला. त्यांना या निवडणुकीत १ लाख ३५ हजार ५४० इतकी मते मिळाली. वडगाव शेरी मतदारसंघातील उमेदवार सुनिल टिंगरे यांनी १ लाख २८ हजार ९७९ मते मिळवली परंतू त्यांचा ४७१० मतांनी पराभव झाला.

राज्यातील मालेगाव मध्य, साकोली, बेलापूर, बुलढाणा, नवापूर व कर्जत-जामखेड या सहा मतदारसंघातील उमेदवारांचा सर्वात कमी मताधिक्याने पराभव झाला. या उमेदवारांमध्ये असिफ शेख रशीद,अविनाश ब्राह्मणकर, संदिप नाईक, जयश्री शेळके, शरद गावित व प्रा.राम शिंदे यांचा समावेश आहे. सर्वात कमी मताधिक्याने पराभव झालेल्या उमेदवारांमध्ये कर्जत-जामखेड मतदारसंघातील भाजपा उमेदवार आमदार प्रा.राम शिंदे हे सहाव्या क्रमांकावर आहेत.

Ram Shinde News , MLA Ram Shinde became the only candidate in the maharashtra who got the highest number of votes and lost by the smallest margin,  maharashtra Vidhan Sabha Election Results 2024,

सर्वात कमी मताधिक्याने पराभव झालेल्या उमेदवारांमध्ये मालेगाव मध्य मतदारसंघातील उमेदवार असिफ शेख रशीद हे पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांचा १६२ मतांनी पराभव झाला. त्यानंतर साकोली मतदारसंघातील उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांचा २०८ मतांनी पराभव झाला. बेलापूर मतदारसंघातील उमेदवार संदिप नाईक यांचा ३७७ मतांनी पराभव झाला. बुलडाणा मतदारसंघाच्या उमेदवार जयश्री शेळके यांचा ८४१ मतांनी तर नवापूर मतदारसंघातील उमेदवार शरद गावीत यांचा ११२१ मतांनी पराभव झाला. तसेच कर्जत-जामखेड मतदारसंघातून भाजपचे उमेदवार प्रा.राम शिंदे यांचा १२४३ मतांनी पराभव झाला.

कर्जत-जामखेड मतदारसंघातील निवडणुकीकडे संपुर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. या निवडणुकीत ६० वर्षांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव, सत्ता, संपत्ती, महाकाय यंत्रणा असलेल्या शरद पवार यांच्या धनदांडग्या नातवाविरोधात सालकर्‍याच्या मुलगा असलेल्या राम शिंदे यांचा सामना होता.पवार घराण्यातील सदस्याविरोधात राम शिंदे यांनी या निवडणुकीत कडवी झुंज दिली. कर्जत-जामखेडची निवडणुक भूमिपुत्र विरूध्द पार्सल व धनशक्ती विरूध्द जनशक्ती अशीच झाली. या निवडणुकीत पवारांच्या धनशक्ती विरोधात लढण्यासाठी शिंदे यांच्या पाठीशी जनशक्ती एकवटली होती. जनतेने स्वयंस्फूर्तपणे शिंदे यांना निवडणूक लढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली.

शिंदे यांनी निवडणुकीत पहिल्यापासून आघाडी घेत रोहित पवार व त्यांच्या यंत्रणेला जेरीस आणले होते. शिंदे हे मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसताच शेवटच्या दोन दिवसांत धनशक्तीच्या बळावर सुत्रे फिरली. मतमोजणीवेळी प्रत्येक फेरीत चढ उतार झाल्याने सर्वांचीच धाकधुक वाढली होती. कर्जत-जामखेडमध्ये ११ तास मतमोजणी चालली.शेवटच्या फेरीपर्यंत रंगलेल्या मतमोजणीत शिंदे यांचा १२४३ मतांनी निसटता पराभव झाला. आमदार प्रा.राम शिंदे यांनी पवारांविरोधात कडवी झुंज दिली. महायुतीच्या चक्रीवादळात रोहित पवार नेस्तनाबूत होता होता थोडक्यात बचावले. रोहित पवारांच्या विजयापेक्षा राम शिंदे यांच्या पराभवाचीच चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेत आली आहे.