पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त 500 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, खर्डा भाजपचा सामाजिक उपक्रम

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : भारतीय जनता पार्टीच्या नेत्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड तालुका भाजपच्या वतीने आज जामखेड तालुक्यात विविध कार्यक्रमांचे  आयोजन करण्यात आले होते.

भाजपच्या वतीने खर्डा येथे 500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच 70 विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. खर्डा येथील मराठी शाळा आणि उर्दू शाळा या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती युवा नेते बाजीराव गोपाळघरे यांनी दिली.

यावेळी कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख रवीदादा सुरवसे, मदन गोलेकर,वैजीनाथ पाटील, बाजीराव गोपाळघरे,भास्कर गोपाळघरे, गणेश शिंदे, पप्पु दिंडोरे,राजु मोरे, राजु गोलेकर, डाॅ. सोपान गोपाळघरे डाॅ बिपीनचंद्र लाड, डाॅ. दत्ता खोत, नानासाहेब गोपाळघरे, बाळासाहेब गोपाळघरे, भागवत सुरवसे,बिबिषन चौघुले, टिल्लू पंजाबी, गोटु कांबळे, भिमराव गोपाळघरे, दादा चौधार, बापु होडशिळ,आण्णा खाडे, मच्छिंद्र गिते, योगेश सुरवसे, गहिनीनाथ खरात, बबलू सुरवसे, सुरज इंगळे, व खर्डा शाळा समिती सर्व शिक्षकवृंद आणि भारतीय जनता पार्टी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.