राम शिंदे विजयोत्सव : भाजपच्या वतीने अहमदनगरमध्ये जंगी कार्यक्रमाचे आयोजन !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री प्रा राम शिंदे हे विधानपरिषद निवडणुकीत राज्यात सर्वाधिक मतांनी विजय झाल्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील भाजपात मोठा उत्साह संचारला आहे. तसेच हा विजय भाजपला बळ देणारा ठरला आहे. राम शिंदे यांचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी अहमदनगर जिल्हा भाजप सज्ज झाली आहे.

विधान परिषदेवर दणदणीत विजय मिळवल्यानंतर आमदार राम शिंदे हे 22 जून रोजी कर्जत – जामखेड मतदारसंघात प्रथमच दाखल झाले होते. शिंदे यांच्या या विजयोत्सवी दौऱ्यात मतदारसंघातील जनता, भाजप कार्यकर्ते आणि शिंदे समर्थकांनी राम शिंदे यांचे भव्यदिव्य जंगी स्वागत केले होते. राम शिंदे यांचा विजयोत्सव दौरा राज्यात गाजला होता.

शिवसेनेच्या बंडाळीत दाऊत इब्राहिमची एन्ट्री, एकनाथ शिंदेंचे नव्या ट्विटने मुंबई बाँबस्फोट, दाऊद इब्राहिमचा मुद्दा आला चर्चेत !

आता राम शिंदे यांचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी अहमदनगर जिल्हा भाजप सज्ज झाली आहे.भाजपकडून अहमदनगर शहरात जंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.त्याचबरोबर अगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारी संदर्भात नियोजन आणि मार्गदर्शन बैठकीचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम अहमदनगर शहरातील माऊली सभागृहात मंगळवार 28 जून रोजी सायंकाळी 5 वाजता होणार आहे.

भाजपचे जेष्ठ नेते तथा आमदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, खासदार सुजय विखे पाटील, आमदार बबनराव पाचपुते, आमदार मोनिकाताई राजळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, चंद्रशेखर कदम, बाळासाहेब मुरकुटे, वैभव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे.

आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री पदावरुन मोठा गौप्यस्फोट

या कार्यक्रमासाठी अहमदनगर जिल्ह्यातील भाजप प्रदेश पदाधिकारी, जिल्हा कार्यकारणी, मंडळ कार्यकारणी, जिल्हा परिषद सदस्य, पंंचायत समिती सदस्य, नगरसेवक, जिल्हा व मंडळ आघाड्या, मोर्चा, शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख व सर्व भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे अवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे, भैय्या गंधे, राजेंद्र गोंदकर यांनी केले आहे.