Nilesh Lanke : रावणाचा अंत झाला तुम्ही कोण आहात ? विखे पिता पुत्रांवर निलेश लंकेचा हल्लाबोल

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी आपल्या आमदारकीच्या राजीनाम्याची घोषणा केली. लोकसभा निवडणुकीसाठी गेल्या काही दिवसांपासून निलेश लंके हे तयारी करत होते. लंके यांनी आमदारकीचा राजीनामा देत लोकसभा निवडणुकीत उमेदवारी करणार असल्याचा निर्णय जाहीर केला. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात निलेश लंके विरुद्ध डाॅ सुजय विखे ( Nilesh Lanke vs sujay Vikhe) हा सामना रंगणार हे स्पष्ट झाले आहे. लंके यांनी सुपा येथे आयोजित बैठकीत विखे पिता-पुत्रावर जोरदार हल्लाबोल केला.

Nilesh Lanka resigned from MLA, Nilesh Lanke news today, End of Ravana? Who are you, Nilesh Lanka's attack on Vikhe father and son

महायुतीच्या काळात जिल्ह्यातील काहींना मंत्रिपद मिळाली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी तर निलेश लंके यांना संपवण्याचा घाट घातला. त्यांनी त्यांच्या राजकीय कार्यकाळात चांगलं काम करण्यापेक्षा वाईटच काम केलं. आपल्या कामाला निधी मिळाला तर अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न पालकमंत्र्यांनी केला,आपल्याला जिरवा जिरवी कारायला कुणी आमदार केलं नाही. माझे विरोधक देखील म्हणतात की, निलेश लंके यांनी आम्हाला कधी त्रास दिला नाही, असेही त्यांनी म्हटले.

आपल्या देशाला छत्रपती शिवरायांच्या विचारांची गरज आहे. त्यासाठी मी शिवपुत्र संभाजी महाराजांचे महानाट्य ठेवले. या महानाट्याबाबत एका पोलिसांनी आपलं मत व्यक्त केलं तर विखेंनी त्या पोलिसाला निलंबित केले. रावणाचा अंत झाला तुम्ही कोण आहात? अशीही टीका निलेश लंके यांनी विखे पिता पुत्रांवर केली.आमच्या एका कार्यकर्त्यांनी पैज लावली होती की खासदारांचा एक फोन कॉल दाखवा हजार रुपये मिळवा. आता तोंड लपवायची वेळ त्यांच्यावर आली असल्याची टीका लंके यांनी सुजय विखे पाटलांवर केली.

मतदार संघातील सर्वांची माफी मागतो, अजित पवारांची माफी मागतो. कारण तुम्ही मला पाच वर्षांसाठी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलं.पण आपल्याला लोकसभेला सामोरे जायचे असेल तर कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे, असे म्हणत राजीनाम्याची घोषणा करताना पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांचे डोळे पाणावले होते. यावेळी उपस्थितांमधून ‘आता रडायचं नाही तर लढायचं’ अशी जोरदार आरोळी ठोकण्यात आली. एकुण लंके यांच्या निर्णयाच्या पाठीशी सर्वांनी एकमुखाने पाठिंबा दिल्याचे या बैठकीत दिसले.

सुपा येथे मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत निलेश लंके यांनी हा निर्णय घेतला आहे. निलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचे जाहीर केले आहे. निलेश लंके राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असून राजीनामा देताना ते भावूक झाल्याचे दिसून आले. चार महिने शिल्लक असताना काही कटू निर्णय आपल्याला घ्यावे लागणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. आता अहमदनगर लोकसभा निवडणुकीत भाजपचे सुजय विखे (Sujay VIkhe) आणि आ. निलेश लंके यांच्यात लढत होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

अजित दादांनी पहाटेची शपथ घेतली नंतर दादांनी दुपारी शपथ घेतली.त्यावेळी अजित पवारांसारखा माणूस राजकारणात असावा म्हणून दादांसोबत गेलो. अजित पवार यांच्याबद्दल आपलं मतं आजही चांगलं आहे आणि उद्याही चांगलं राहील. दादांनी राजकारणात मला खूप मदत केली, असे म्हणत लंके यांनी अजितदादांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

निलेश लंके यांनी कार्यकर्ता मेळाव्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे, सुजय विखे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. त्यांनी मला संपविण्याचा घाट घातला होता. माझ्या अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. तुमच्या पीएने पंधरा टक्कांनी पैसे जमा केले आहेत. तुमच्या पीएलाही पीए आहेत, असा आरोपही लंके यांनी केला आहे. तुम्ही एक तरी जिल्ह्यात मेडिकल कॉलेज आणले का ? केवळ आपले मेडिकल कॉलेज व आपली यंत्रणा चालविण्याचे काम ते करत आहेत.

निवडणुकीला आपल्याला सामोरे जायचे आहे. ही पारनेरकरांची अस्तित्वाचे लढाई आहे. प्रत्येकांनी मी उमेदवार म्हणून बाहेर पडले पाहिजे. गावाचे गावे पॅक करा. आपल्या तालुक्याची अस्तित्वाचे लढाई आहे, असे आवाहन निलेश लंके यांनी केली आहे. ते येतील पैसे देतील. पैसे घेऊन जा, अशी सांगायची भूमिका घ्या. आता उघड्या डोळ्याने पाहून उपयोग नाही. प्रत्येकाने निवडणूक हाती घेतली पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत निवडणूक जिंकायची आहे, असे भावनिक आवाहन निलेश लंके यांनी केले आहे.

मी जे बोलतो तेच मी करतो, पण त्यांनी पाच वर्षांत जे अश्वासने दिली त्यातले एकही अश्वासन त्यांनी पुर्ण केलं नाही. दुसर्‍याच्या झेंड्यावर पंढपुर करणारी आपली अवलाद नाही. असे म्हणत लंके यांनी विखेंना जोरदार समाचार घेतला.