‌राष्ट्रवादीने हाती घेतली सदस्य नोंदणी मोहीम, खर्डा आणि जामखेडमध्ये होणाऱ्या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित रहा – प्रा मधुकर राळेभात

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्राथमिक क्रियाशील सदस्य नोंदणी मोहिम जामखेड तालुक्यात हाती घेतली आहे. त्यादृष्टीने 15 रोजी खर्डा आणि जामखेड शहरात व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, ही बैठक आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुख प्रा मधुकर राळेभात यांनी दिली.

NCP undertakes membership registration drive, attend meetings in Kharda and Jamkhed in large numbers - Prof Madhukar Ralebhat

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राथमिक क्रियाशील सदस्य नोंदणी करण्यासाठी होणाऱ्या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी ,बूथ प्रमुख कोअर कमिटी सदस्य, शाखाप्रमुख व ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना निमंत्रण धाडण्यात आले आहे.

15 रोजी दुपारी एक वाजता खर्डा शहरातील रत्न सुरेश कॉम्प्लेक्स या ठिकाणी राष्ट्रवादीची बैठक पार पडणार आहे.या बैठकीसाठी जातेगाव, दिघोळ, माळेवाडी, मोहरी, तेलंगशी, जायभायवाडी, धामणगाव, देवदैठण, नाहुली, नायगाव, बांधखडक,आनंदवाडी, बाळगव्हाण, वाकी, लोणी, खर्डा ग्रामपंचायत, सातेफळ, तरडगाव, वंजारवाडी, सोनेगाव, धनेगाव या गावांमधील कार्यकर्त्यांना बोलावण्यात आले आहे.

तर जामखेड शहरात सायंकाळी सात वाजता आमदार रोहित पवार यांच्या कार्यालयात होणाऱ्या बैठकीसाठी जामखेड शहर व जुना साकत गण या गावातील कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. खर्डा आणि जामखेड शहरात पार पडणाऱ्या बैठकीसाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे अवाहन प्रा मधुकर राळेभात यांनी केले आहे.