भाजपा नेते सचिन पोटरे यांच्या गाडीला पुण्याजवळ अपघात

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांच्या गाडीला पुण्याजवळ अपघात झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत दैव बलवत्तर म्हणून पोटरे आणि इतर दोघे बजावले आहेत. ही घटना आज दुपारी बारा वाजता घडली.

BJP leader Sachin Potare's car accident near Pune

याबाबत मिळालेली माहिती अशी की, कर्जत भाजपचे नेते तथा भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत आज पुण्याहून कर्जतला निघाले होते. दुपारी बाराच्या सुमारास पुणे जिल्ह्यातील खडकी रावणगाव परिसरात चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पोटरे यांच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातात पोटरे यांच्या गाडीने सहा वेळा पलट्या मारल्या. दैव बलवत्तर म्हणून गाडीतील तिघे जण बचावले आहेत.

या अपघातात भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, गाडीचालक परभत सुरवसे (लॅब संचालक), रेणुकामाता पतसंस्थेचे व्यवस्थापक हे तिघे किरकोळ जखमी झाले आहेत. सर्वजण सुखरूप असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार केले जात आहेत.

दरम्यान, सदर अपघाताची माहिती मिळताच आमदार राम शिंदे यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधून तातडीने मदत करण्याच्या सुचना दिल्या. पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत मदतकार्य केले.