Karjat Nagar Panchayat Election Campaign | काँग्रेस नेते हार्दिक पटेल, मंत्री धनंजय मुंडे आज कर्जत दौऱ्यावर
जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख | संपुर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या कर्जत नगरपंचायत निवडणुकीत प्रचाराच्या तोफा धडाडू लागल्या आहेत. (Karjat Nagar Panchayat Election Campaign) महाविकास आघाडीकडून आज प्रचाराचा मोठा बार उडवला जाणार आहे.
याच पार्श्वभूमीवर गुजरात काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल व राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आज कर्जत दौर्यावर येणार आहेत. दोन्ही नेते काय बोलणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. (Congress leader Hardik Patel, Minister Dhananjay Munde on a visit to Karjat today)
महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. कर्जत नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा दुहेरी सामना पाहायला मिळत आहे. आमदार रोहित पवार MLA Rohit Pawar यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) ही निवडणूक लढवत आहे. तर माजी मंत्री राम शिंदे Ram Shinde BJP यांच्या नेतृत्वाखाली भाजप निवडणूक लढवत आहे.
गेल्या तीन चार दिवसांत कर्जतमध्ये मोठ्या राजकीय उलथापालथी झाल्या आहेत. आरोप प्रत्यारोपांचा धुराळा उडाला आहे. पवार विरूध्द शिंदे हा संघर्ष शिगेला पोहोचला आहे. हा संघर्ष आणखीन चिघळण्याची शक्यता आहे. राज्यात येथील निवडणूक हायव्होल्टेज ड्रामा ठरणार असेच चित्र आहे.
आज 17 डिसेंबर,रोजी कर्जत येथे काँग्रेस नेते व गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल तसेच महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. कर्जत येथील फाळके पेट्रोल पंपाशेजारी ही सभा दुपारी ४ वाजता पार पडणार आहे.
दरम्यान, कर्जत नगर पंचायत निवडणूक संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेच्या केंद्रस्थानी असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच आता राज्य तसेच देश पातळीवरील मोठे राजकीय नेते नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जत येथे येत असल्याने या सभेला मोठ्या प्रमाणात जनतेने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे.
काँग्रेसचे युवा नेते हार्दिक पटेल आणि राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री धनंजय मुंडे हे कर्जतच्या जनतेला संबोधित करणार आहेत. तसेच या भव्य आणि जाहीर सभेची तयारीही मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांकडून सुरू असल्याचं कर्जतमध्ये दिसून येत आहे.
जामखेड शहरातून या सभेसाठी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. त्यादृष्टीने कालपासून जामखेडमध्ये राष्ट्रवादीच्या बैठका पार पडल्या. गाड्यांचे नियोजन करण्यात आले. सोशल मिडीयावरून या सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे अवाहन करण्यात येत आहे. कर्जतमधील सभेत राष्ट्रवादी मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे असेच दिसत आहे.
दो दिवसीय महाराष्ट्र दौरे पर हूँ, अभी पुणे एयरपोर्ट पर एनएसयूआई एवं एनसीपी के पदाधिकारियों ने स्वागत किया। कल सुबह भीमाशंकर ज्योतिर्लिंग दर्शन करूँगा एवं शाम को अहमदनगर ज़िले में जनसभा को संबोधित करूँगा। pic.twitter.com/uwcAsBdk7n
— Hardik Patel (@HardikPatel_) December 16, 2021