राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाची जामखेड कार्यकारिणी जाहीर

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये जामखेड शहराध्यक्षपदी धडाडीचे युवा कार्यकर्ते पप्पूभाई सय्यद यांची निवड करण्यात आली. आमदार रोहित पवार यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

आमदार रोहित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्जत जामखेड मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विस्तार व्हावा, त्याचबरोबर पक्ष संघटना मजबूत व्हावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संघटनात्मक बांधणी हाती घेतली आहे.त्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीच्या जामखेड शहराध्यक्षपदी पप्पू भाई सय्यद यांची निवड करण्यात आली. आमदार रोहित पवार यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, अल्पसंख्याकचे तालुकाध्यक्ष उमर कुरेशी, संजय वराट, विजय पवार यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी निवडीनंतर बोलताना पप्पू भाई सय्यद म्हणाले की, जामखेड शहरातील अल्पसंख्याक समाजाचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी आमदार रोहित दादा पवार यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील. अल्पसंख्यांक समाजामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार रुजवण्यासाठी शहर कार्यकारणी काम करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

जामखेड राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक आघाडी नवनियुक्त पदाधिकारी खालील प्रमाणे

  • जामखेड शहराध्यक्ष – पप्पूभाई सय्यद
  • कार्याध्यक्ष – समीर पठाण
  • तालुका उपाध्यक्ष – चांद तांबोळी
  • तालुका उपाध्यक्ष – सलीम शेख
  • गट प्रमुख – अमर चाऊस
  • तालुका उपाध्यक्ष – राजू सय्यद खर्डा
  • तालुका उपाध्यक्ष – अन्सार पठाण