जामखेड तालुका मीडिया क्लबची स्थापना, अध्यक्षपदी सुदाम वराट तर सचिवपदी सत्तार शेख यांची निवड

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी जामखेड तालुका मीडिया क्लबची आज जामखेडमध्ये स्थापना करण्यात आली. यावेळी या संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी सुदाम वराट तर सचिवपदी सत्तार शेख यांची यावेळी निवड करण्यात आली. (Establishment of Jamkhed Taluka Media Club, Sudam Varat as President and Sattar Sheikh as Secretary)

जामखेड तालुक्यातील पत्रकारांच्या बैठकीचे आज जामखेड येथील केशर हॉल या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. यावेळी पार पडलेल्या बैठकीस 15 पेक्षा अधिक पत्रकार उपस्थित होते.या बैठकीमध्ये जामखेड तालुक्यातील पत्रकारांच्या विविध अडीअडचणी संदर्भामध्ये चर्चा करण्यात आली.

त्याचबरोबर नव्या पत्रकार संघटनेच्या स्थापनेवर चर्चा झाली. त्यानंतर सर्व पत्रकारांच्या संमतीने जामखेड तालुका मीडिया क्लब या नव्या पत्रकार संघटनेच्या स्थापनेचा निर्णय झाला. जामखेड तालुक्यातील पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी निर्माण झालेल्या जामखेड तालुका मीडिया क्लब या नव्या पत्रकार संघटनेच्या ध्येय धोरणावर सर्व पत्रकारांनी आपले मत मांडले.

दरम्यान या बैठकीमध्ये जामखेड तालुका मीडिया क्लब या नव्या संघटनेच्या जामखेड तालुका कार्यकारणीची निवड करण्यात आली. यावेळी जामखेड तालुका अध्यक्षपदासाठी सुदाम वराट यांच्या सुचना संतोष गर्जे यांनी मांडली त्यास किरण रेडे यांनी अनुमोदन दिले. तर सचिवपदासाठी सत्तार शेख यांच्या सुचना अविनाश बोधले यांनी मांडली त्यास पप्पुभाई सय्यद यांनी अनुमोदन दिले.यावेळी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी जेष्ठ पत्रकार दत्तात्रय राऊत, जेष्ठ पत्रकार फयाकअली सय्यद, विश्वदर्शनचे संपादक गुलाब जांभळे, साप्ताहिक नगर व्हिजनचे संपादक संजय वारभोग, जामखेड टाइम्सचे संपादक सत्तार शेख, जामखेड न्यूजचे संपादक सुदाम वराट, रोखठोक न्यूजचे संपादक अविनाश बोधले, विश्वदर्शनचे उपसंपादक किरण रेडे, साप्ताहिक पोलीस वारंटच्या संपादिका श्वेता गायकवाड, पत्रकार पप्पूभाई सय्यद, अशोक वीर, राजेंद्र भोगील, धनराज पवार, संतोष गर्जे, अजय अवसरे राजू म्हेत्रे सह आदी पत्रकार उपस्थित होते.

जामखेड तालुका मीडिया क्लब कार्यकारणी

 • सुदाम वराट  – तालुकाध्यक्ष
 • सत्तार शेख- सचिव
 • अशोक वीर – उपाध्यक्ष
 • श्वेता गायकवाड – उपाध्यक्ष
 • पप्पुभाई सय्यद- सह सचिव
 • दत्तात्रय राऊत- कार्याध्यक्ष
 • राजू म्हेत्रे – खजिनदार
 • धनराज पवार  – प्रसिद्धीप्रमुख
 • संजय वारभोग – सल्लागार
 • गुलाब जांभळे – मार्गदर्शक
 • फयाकअली सय्यद – मार्गदर्शक
 • अविनाश बोधले – सदस्य
 • किरण रेडे – सदस्य
 • संतोष गर्जे –  सदस्य
 • राजेंद्र भोगील – सदस्य
 • अजय अवसरे – सदस्य