Big Breaking News | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना कोरोनाची लागण, पवारांनी ट्विट करत दिली माहिती | NCP President Sharad Pawar Corona Positive
जामखेड टाईम्स वृत्तसेवा, मुंबई | Big Breaking News |राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना कोरोनाची बाधा झाली आहे. याबाबत स्वता : पवार यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.(NCP President Sharad Pawar Corona Positive)
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत घरातूनच कारभार केला होता. कोरोना नियमांचे पालन करून त्यांनी घरातच राहणे पसंत केले होते. परंतू दुसरी लाट ओसरल्यानंतर पवार हे मोठ्या ऊर्जेने राज्यात सक्रीय झाले होते.
कोरोनाच्या दोन्ही लाटेत पवारांनी कोरोनाला आपल्या जवळही फिरकू दिले नव्हते परंतू तिसऱ्या लाटेत कोरोनाने पवारांना गाठले. शरद पवार यांना कोरोनाची बाधा झाली आहे. याबाबत त्यांनी स्वता: ट्विटरवरुन माहिती दिली आहे.
पवार आपल्या ट्विट (Sharad Pawar Twitt) मध्ये म्हणतात की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.मात्र काळजी करण्याचं कारण नाही, माझ्या डाॅक्टरांच्या सल्ल्याने मी उपचार घेत आहे. पण, गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना टेस्ट करून घ्यावी व आपली काळजी घ्यावी असे अवाहन पवारांनी केले आहे.