केमिकल कंपनीला लागली भीषण आग, कोट्यावधीचे नुकसान, इचलकरंजीतील आवाडे टेक्स्टाईल पार्कमधील दुर्घटना

कोल्हापूर, इचलकरंजी । कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील इचलकरंजी भागातून भीषण आगीची एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत इचलकरंजीपासून (Ichalkaranji) जवळच असलेल्या तारदाळ येथील आवाडे टेक्स्टाईल पार्कमधील (Awade Textile Park) केमिकल फॅक्टरीला भीषण आग (Fire in Chemical factory today) लागली. या आगीत कोट्यावधींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

केमीकल कंपनीत स्फोट झाल्याने आगीने रौद्ररुप धारण केले.घटनास्थळी अग्निशामक दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान, या आगीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे. (Kolhapur Ichalkaranji Awade Textile Park Fire in Chemical factory today)

सकाळच्या सुमारास लागलेल्या आगीमुळे सगळीकडे धुराचे लोट पसरले होते. सदरची आग नेमकी कशामुळे लागली याबाबतचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. धूराचे लोट मोठे असल्याने आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. तसेच सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात वारे सुटल्याने धुराचे लोट आकाशात पसरल्याने एक प्रकारचा काळोखच निर्माण झाला होता.

ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मिलला लागलेल्या या अचानक आगीमुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. दुपारपर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न सुरूच होते.

Kolhapur Ichalkaranji Awade Textile Park Fire in Chemical factory today