Ajit Pawar Birthday : कर्जत – जामखेडमधील आरोग्य तपासणी शिबिराचे वेळापत्रक जाहीर, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – आमदार रोहित पवार
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित (दादा) पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 20 जूलै ते 27 जूलै या कालावधीत कर्जत- जामखेड मतदारसंघात भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे गावनिहाय वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
22 जुलै रोजी अजितदादा पवार यांचा वाढदिवस आहे. अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या दोन दिवसाआधी पासून कर्जत जामखेड मतदारसंघात आरोग्य शिबिराचे आयोजन केले जाणार आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघातील शहरी भागासह ग्रामीण भागातही या शिबिराचे आयोजन होणार आहे.
या शिबिरासाठी पुण्यातील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम असणार आहे. या शिबिरात आरोग्य तपासणी, उपचार व सल्ला याचा लाभ जनतेला मिळणार आहे. या शिबिराबाबत अधिक माहितीसाठी ९६९६३३०३३० या क्रमांकावर संपर्क करण्याचे अवाहन करण्यात आले आहे.
![Ajit Pawar Birthday : Schedule of free health check-up camp in Karjat Jamkhed constituency announced, citizens should participate in large numbers, MLA Rohit Pawar urges](http://jamkhedtimes.com/wp-content/uploads/2022/07/Ajit-pawar-birthday--656x1024.jpg)
20 ते 27 जुलै दरम्यान कर्जत – जामखेड मतदारसंघात आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन आमदार रोहित दादा पवार यांनी केले आहे.
आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून कर्जत जामखेड मतदारसंघात होणाऱ्या मोफत आरोग्य शिबीराचे गावनिहाय वेळापत्रक खालील प्रमाणे
![Ajit Pawar Birthday : Schedule of free health check-up camp in Karjat Jamkhed constituency announced, citizens should participate in large numbers, MLA Rohit Pawar urges](http://jamkhedtimes.com/wp-content/uploads/2022/07/Ajit-pawar-birthday-health-camp-news-today--814x1024.jpg)
कर्जत तालुक्यातील वेळापत्रक
![Ajit Pawar Birthday : Schedule of free health check-up camp in Karjat Jamkhed constituency announced, citizens should participate in large numbers, MLA Rohit Pawar urges](http://jamkhedtimes.com/wp-content/uploads/2022/07/Ajit-pawar-birthday-health-camp-news-838x1024.jpg)