MLA Ram Shinde : म्हणून आमदार प्रा.राम शिंदे 9 दिवसांच्या मध्यप्रदेश दौऱ्यावर, पक्षाने सोपवली महत्वाची जबाबदारी !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा :  मध्यप्रदेश विधानसभेसाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी हाती घेतली आहे. २३० विधानसभा मतदारसंघाची सद्यस्थिती समजून घेण्यासाठी भाजपने देशभरातील भाजपा आमदारांना मध्यप्रदेशात पाचारण केले आहे.त्यात महाराष्ट्रातून ४७ आमदारांचा समावेश आहे. हे आमदार ९ दिवसांच्या मध्यप्रदेश दौऱ्यासाठी गेले आहेत. त्यात कर्जत-जामखेड मतदारसंघातून राज्याचे माजी मंत्री तथा आमदार प्रा.राम शिंदे यांचा समावेश आहे.

Therefore MLA Prof. Ram Shinde six-day visit to Madhya Pradesh, party entrusted him with an important responsibility

मध्यप्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून भाजपने मतदारसंघ निहाय तयारी हाती घेतली आहे. राज्याबाहेरील प्रत्येक आमदारांकडे एका मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.या आमदारांनी दिवसभरात तिथे काय करायचे? याचा संपूर्ण कार्यक्रम भाजपकडून निश्चित करण्यात आला आहे. त्याचा अहवालही त्यांनी ९ दिवसांनंतर केंद्र सरकारला द्यायचा आहे.

अहमदनगर जिल्ह्यातून आमदार प्रा.राम शिंदे हे मध्यप्रदेश दौऱ्यावर गेले आहेत. त्यांच्यावर छिंदवाडा जिल्ह्यातील जुन्नारदेव विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. या मतदारसंघातील विविध घटकांशी आमदार प्रा.राम शिंदे संवाद साधत आहेत. त्यांच्या दौऱ्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. २७ ऑगस्ट २०२३ पर्यंत त्यांचा हा दौरा असणार आहे. या दौर्‍यानंतर आमदार प्रा.राम शिंदे हे जुन्नारदेव मतदारसंघाचा अहवाल भाजपच्या राज्य आणि केंद्रीय टीमला पाठवणार आहेत.

आमदार प्रा.राम शिंदे यांच्यासह मुंबई व राज्यातील अन्य जिल्ह्यांमधील ४७ आमदारांनाही तिथे पाठवण्यात आले आहे. महाराष्ट्राशिवाय बिहार, गुजरात व उत्तर प्रदेश या तीन राज्यातील आमदारांनाही मध्यप्रदेशात निवडणूकपूर्व जबाबदारी देण्यात आली आहे. गुजरातमधील आमदार अमित ठाकर यांच्या अध्यक्षतेखाली मध्यप्रदेशातील २३० मतदारसंघासाठी भाजपने विधायक प्रवास योजना हाती घेतली आहे. या दौऱ्यात आमदार प्रा राम शिंदे यांच्या समवेत गुजरातमधील भाजपा नेते हार्दिक पटेल हेही सहभागी झाले आहेत.

Therefore MLA Prof. Ram Shinde six-day visit to Madhya Pradesh, party entrusted him with an important responsibility

पहिल्या टप्प्यात ६ दिवसांचा दौरा, त्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक जाहीर झाल्यावर पुन्हा १५ दिवसांचा दौरा अशी रचना करण्यात आली आहे. पक्षाच्या केंद्रीय शाखेने हा सर्व कार्यक्रम निश्चित केला असून, त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Therefore MLA Prof. Ram Shinde six-day visit to Madhya Pradesh, party entrusted him with an important responsibility

दिवसभरात या आमदारांनी त्यांना दिलेल्या विधानसभा मतदारसंघात ६ बैठका घ्यायच्या आहेत. या बैठका वेगवेगळ्या स्तरातील मतदारांच्या व कार्यकर्त्यांच्या असतील. त्यामध्ये व्यापारी, नोकरदार, महाविद्यालयीन युवक-युवती याबरोबरच भाजपच्या वेगवेगळ्या मंचातील कार्यकर्त्यांच्या बैठकांचाही समावेश आहे. संपूर्ण मतदारसंघ फिरणे, तिथे दिवसभरात अशा ६ बैठका घेणे, त्यामध्ये मतदारांना भाजपविषयी, केंद्र सरकार व राज्य सरकारच्या योजनांविषयी समजावून सांगणे असे करायचे आहे. पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांच्याकडून ते करत असलेल्या कामाची माहिती घेणे, त्यांना सक्रिय करणे अशा प्रकारच्या कामाचा समावेश आहे.

Therefore MLA Prof. Ram Shinde six-day visit to Madhya Pradesh, party entrusted him with an important responsibility

हा ६ दिवसांचा दौरा निवडणूकपूर्व दौरा आहे. आमदारांनी आपल्या राज्यात परतल्यानंतर त्यांनी घेतलेल्या बैठका, त्याची माहिती, त्यात सहभागी झालेले लोक यासह विधानसभा मतदारसंघात त्यांना जाणवलेली निरीक्षणं याची नोंद करायची आहे. कोणत्या समस्या आहेत, कशावर लक्ष देणे गरजेचे आहे, कोणता विषय चालू शकेल, कोणता विषय अग्रस्थानी आणणे गरजेचे आहे, आश्वासनं कोणती द्यायची याप्रकारची ही निरीक्षणं असतील. आमदारांनी त्यांचा हा अहवाल लिखित स्वरूपात केंद्र व मध्यप्रदेशमध्ये पक्षाच्या वरिष्ठांना पाठवायचा आहे. त्यावर निवडणुकीची रणनीती ठरेल, त्यामुळे अहवाल एकदम वस्तुस्थिती निदर्शक असावा, अशा सूचना आमदारांना देण्यात आल्या आहेत.

मध्यप्रदेश दौऱ्यावर असलेले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे माहेरचे वंशज आमदार प्रा.राम शिंदे यांची मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी भेट घेतली. यावेळी मध्यप्रदेशचे कृषि मंत्री कमल सिंह पटेल हे उपस्थित होती. यावेळी उभय नेत्यांमध्ये प्रदिर्घ चर्चा झाली.