राम शिंदेंचे व्हाट्सअप स्टेटस चर्चेत, राम शिंदे म्हणतात, मै समंदर हुँ, लौटकर वापस आऊंगा !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। राज्यात राज्यसभा (rajysabha) निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. भाजपने (BJP) सातवा उमेदवार रिंगणात उतरवल्याने ही निवडणूक रंगतदार अवस्थेत पोहोचली आहे. तर दुसरीकडे विधान परिषदेच्या (Vidhanparishad) निवडणुकीची जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. अश्यातच माजी मंत्री प्रा राम शिंदे (Ram Shinde) यांचे एक व्हाट्सअप स्टेटस आज राज्यात चर्चेत आले आहे. (Ram Shinde’s WhatsApp status discussion, Ram Shinde says, mai Samandar hu, lotkar vapas aaunga)

भाजपकडून विधान परिषदेसाठी जी नावे सर्वाधिक चर्चेत आहेत, त्यात राम शिंदे यांचे नाव पहिल्या तीनमध्ये आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणुन माजी मंत्री राम शिंदे ओळखले जातात. माजी मंत्री राम शिंदे यांचे नाव राज्यसभा उमेदवारीसाठी भाजपच्या दिल्ली हायकमांडकडे पाठवण्यात आले होते, मात्र त्यावेळी त्यांची लॉटरी लागली नाही. मात्र आता भाजपकडून विधानपरिषदेसाठी त्यांचा दावा मोठा आहे.

राम शिंदे यांच्या नावाविषयी पक्षात अनुकूलता आहे. विधानपरिषदेसाठी भाजपकडून जी नावे स्पर्धेत आहेत, त्यात शिंदे यांचे नाव वरचढ आहे.लवकरच विधानपरिषदेच्या उमेदवारांची घोषणा होणार आहे.शिंदे यांच्या उमेदवारीविषयी कर्जत जामखेड मतदारसंघासह राज्यातील शिंदे समर्थकांमध्ये मोठी उत्सुकता लागली आहे.

दरम्यान राम शिंदे यांचे एक व्हाट्सअप स्टेटस आज राज्यात चर्चेत आले आहे. या स्टेटसमध्ये म्हटले आहे की, मेरा पाणी उतरता देख… मेरे किनारे पर घर मत बना लेना…मै समंदर हूँ…लौटकर वापस आऊंगा.. या ओळी लिहिल्या आहेत. या ओळींचा नेमका अर्थ काय ? याचा शोध राजकीय वर्तुळात घेतला जाऊ लागला आहे.

Ram Shinde says, mai Samandar hu, lotkar vapas aaunga

राम शिंदे यांनी ठेवलेल्या व्हाट्सअप स्टेटसकडे आगामी विधान परिषद निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. राम शिंदे यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री राम शिंदे यांच्या उमेदवारीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. उमेदवारीची घोषणा कधी होते, याकडे मतदारसंघातील जनता आणि शिंदे समर्थकांच्या नजरा लागल्या आहेत.