राम शिंदेंची जोरदार बॅटिंग : तुम्ही माझा नादचं पुरा करून टाकला धन्यवाद तुम्हाला ते रोहित पवारांच्या कारभाराचे वाभाडे

तोंड दाबून बुक्क्यांचा मार;असा सर्रास विकास चाललाय

  • ठळक मुद्दे
  • आमदारांनी छातीवर हात ठेऊन सांगावं
  • गडकरी विखे मोठ्या मनाची माणसं
  • तुम्ही माझा नादचं पुरा करून टाकला धन्यवाद तुम्हाला
  • तोंड दाबून बुक्क्यांचा मार ; सर्रास असा विकास चाललाय
  • दोन वर्षात एखादी कांदा चाळ मिळाली का ?
  • तुम्हाला तलाठ्याच्या ऑफीसमध्ये कुणी इचारीना
  • त्या टायमाला माझं नाही ध्यान झालं तर मग बोला
  • तुम्ही तर वाट बघत बसा
  • बिलं भरून टाक अन मग फोन कर
  • ब्वाॅ, या इकडं कापा सुपारी आणि द्या पान, एवढचं खातं चालूयं
  • माझ्या काळातलं प्रकरण होतं म्हणून थांबवून धरलंय.
  • बाबा जेवले पतार पालथं

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तारशेख ।  “सगळ्यांची चेहरे बघतोय, सगळ्यांना कसं बरं वाटतयं, मोक्कारचं बरं वाटतयं, आता सांगता येईना अन बोलता येईना, निव्वळ अवघड जाग्यावरचं दुखणं झालंय, पण शेजारच्या गड्याला काम दाखवलं, कशी जिरवली म्हणता? माझी तर जिरली तर जिरली, पण आता जेव्हा मी बाहेर आलो, तेव्हा सगळी माणसं म्हणतात आमची जिरली” असे म्हणत माजी मंत्री प्रा राम शिंदे (Former Minister Prof. Ram Shinde) यांनी जोरदार बॅटिंग केली.

माजी मंत्री राम शिंदे व खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत जामखेड तालुक्यातील हळगावमध्ये मंगळवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शिंदे यांनी चौफेर फटकेबाजी केली. मागील दोन वर्षात निर्माण झालेल्या परिस्थितीवर तिखट शब्दांत भाष्य केले. विधानसभा निवडणुकीतील पराभवाची वेदनाही यावेळी बोलून दाखवली. तसेच आमदार रोहित पवार यांच्या कारभारावर जोरदार आसूड ओढले.

गडकरी विखे मोठ्या मनाची माणसं

केंद्रीय मंत्रि नितीन गडकरी व खासदार सुजय विखे हे मोठ्या मनाची माणसं आहेत हे कामं मंजुर करतात आणि शरद पवारांना कार्यक्रमाला उपस्थित ठेवतात. आम्ही प्रयत्न केला आमच्या काळात प्रस्ताव गेले, खासदारांच्या काळात मंजूर झाले पण उपस्थित शरद पवारांना ठेवतेत,का तर? नातवाला उलीतीली संधी मिळावी.नाहीतर पारच उचलून टाकल्यावानी होईन अशी सडकून टीका करत शिंदे यांनी बार उडवून दिला.

तुम्ही माझा नादचं पुरा करून टाकला धन्यवाद तुम्हाला

आपल्याच सभेत बोलता येतं, नाही तर दुसरीकडं लै अवघडयं, गडी राखणचं असत्येत, ज्या कार्यकर्त्याने जसा नाद केला तसाच मी पुरा करायचा प्रयत्न केला. पण तुम्ही माझा नादचं पुरा करून टाकला धन्यवाद तुम्हाला असे म्हणत शिंदे यांनी पराभवाची वेदना बोलून दाखवली

दोन वर्षात मिळाली का एखादी कांदा चाळ  ?

आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कधी तरी संधी येते. त्या संधीचं सोनं करण्याचा मी प्रामाणिक, इमाने ऐतबारे प्रयत्न केला. जलयुक्त शिवाराच्या माध्यमांतून असेल किंवा इतर अनेक योजनांच्या माध्यमांतून असेल सगळ्यांच्या बांधापर्यंत, घरापर्यंत विकास पोहोचवण्याचे काम केलं. लोक म्हणतात काय केलं? अरे कांदा चाळी इतक्या दिल्या त्यात लोकं जाऊन राहायला लागली. पण आता दोन वर्षात एखादी कांदा चाळ मिळाली का ? कांदा चाळीचा जेवढा विदर्भाला कोटा होता तितका कोटा मी एकट्या कर्जत – जामखेड मतदारसंघाला आणला होता असे सांगत शिंदे यांनी मागील दोन वर्षांत थंडावलेल्या विकासावर बोट ठेवले.

तुम्हाला तलाठ्याच्या ऑफीसमध्ये कुणी इचारीना

मी मंत्रि असताना कुणीही म्हणायचं करू का साहेबाला फोन, लगेच अधिकारी म्हणायचा नको घेतो ना तुझं नाव यादीत. नगरपर्यंत कलेक्टर ऑफीस ला जाऊन म्हणायचे करू का फोन पण आता तुम्हाला तलाठ्याच्या ऑफीसमध्ये कुणी इचारीना अशी परिस्थिती झालीय असे शिंदे म्हणाले.

त्या टायमाला माझं नाही ध्यान झालं तर मग बोला

मी मंत्री असतानाच्या काळात डिपी जळाली अन डिपी महिनाभर मिळाली नाही असा एक दिवस होता का ?  तिसऱ्या दिवसांत डिपी येऊन बसवायची, जळालेली घेऊन जायची. पण आता डिपीचं तर सोडाचं आता लाईट दोन दिवसालाय आणि ती पण सतत नाही.असा सगळा प्रकार चाललाय. विम्याचा पैसा नाही, डिप्या अजुन उतरायला सुरू व्हायच्या, भरणं अजून सुरू झाले नाही. जसं भरणं येईल तश्या जर डिप्या नाही उतरिवल्या अन त्या टायमाला माझं नाही ध्यान झालं तर मग बोला असे म्हणतं जनतेला मागील पाच वर्षाच्या कारभाराची शिंदे यांनी आठवण करून दिली.

तुम्ही तर वाट बघत बसा

लोकं म्हणत होती कुकडीचा कॅनाॅल यायचाय आपल्या भागात पण गेल्या दोन वर्षांपासून कर्जत तालुक्यात उन्हाळ्याचे आवर्तने बंद आहेत. तुम्ही तर बसा वाट बघत असे म्हणत अप्रत्यक्षपणे आमदार रोहित पवार यांच्यावर शिंदे यांनी निशाणा साधला.

बिलं भरून टाक अन् मग फोन कर

मंत्री असताना पाच वर्षात बील नाही मागितलं, पाच वर्षात पदर भरून कुणाला डिपी लावावी लागली नाही. आता डिप्या पदर भरून आणाव्या लागतात. फोन करून बघा आमची डिपी उतरायला लागलेत डिपी जळालीय मग समोरून उत्तर येईल बिलं भरून टाक अन मग फोन कर,  वाह रं पठ्ठ्या हिच पाहिजं व्हतं असं लोक म्हणतात अशी खोचक टिका करत शिंदे यांनी रोहित पवारांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

तोंड दाबून बुक्क्यांचा मार;असा सर्रास विकास चाललाय

पाच दिवसानंतर निवडणुकीला दोन वर्षे पुर्ण होतील. मी दिवस मोजतोय. तुम्ही मोजतात की नाही मला माहित नाही. त्यामुळं आता तीन वर्षे अशीच कळ सोसायची. त्यांना गर्दी आवडत नाही तुम्ही करायची प्रयत्न करू नका. आता तुम्हाला कळलयं, मला कळलयं, कवा बवा माणसं म्हणायची इथून जायचे पण काचच खाली करत नव्हते.आता ती काच खाली नाही आणि दिसतही नाही असा टोला लगावत इकडून तिकडून कुणी काय केलं बोळीत गाटून, वेशीत आडवून , तोंड दाबून बुक्क्यांचा मार;असा सर्रास विकास चाललाय अशी घणाघाती टीका शिंदे यांनी रोहित पवार यांचे नाव न घेता केली.

माझ्या काळातलं प्रकरण होतं म्हणून थांबवून धरलंय.

हळगाव आणि पिंपरखेडच्या मध्ये 33 केव्हीचा प्रस्ताव मंजुरीला टाकला होता. माझ्या काळातलं प्रकरण होतं म्हणून थांबवून धरलंय. हळगाव, चौंडी,आघी,सह आदी भागाला पुर्ण दाबाने वीज मिळावी यासाठी 33 केव्ही चा प्रस्ताव टाकला होता पण हे काम थांबलयं असाही आरोपी शिंदे यांनी केला.

आमदारांनी छातीवर हात ठेऊन सांगावं

माझ्या काळात रस्त्यांवर कधीच खड्डे पडू दिले नाही पण आता तुमच्या घरासमोर खड्डे पडले तरी कुणाला बघायला वेळ नाही. दुसऱ्याचे जे काही रस्ते झाले ते पण मुरूमाचे  हळगाव ते आधी हा रस्ता आमदार रोहित पवार यानी मंजूर केला हे त्यांनी छातीवर हात ठेऊन सांगावे असे अव्हान देत आम्ही तिकडे नारळ फोडला तर ह्यांनी इकडून फोडला. जिथे त्यांनी नारळ फोडला तिथं रस्ता झाला नाही, त्याच्या पुढे टप्पा गेला असे सांगत सरकारने बंद केलेल्या मुख्यमंत्री सडक योजनेचे  नारळ फोडत पवार फिरतात अशीही टिका शिंदे यांनी केली.

बाबा जेवले पतार पालथं

मोक्याच्या टायमाला हळगाव का असं करतयं? काय मेळचं लागाना मला. पिंपरखेड गेलं तर एकवेळ समजू शकतो. लै जीव लावलाय राव हळगावला. कुणाला खोटी केस करून आत टाकलं का ? का दहा पाच गुंठे कुणाचं घेतलयं का?  का कुणाचा कब्जा मारलाय? काय केलयं काय मी ?  असे सवाल उपस्थित करत असताना उपस्थित  एकाने आता आम्ही सोबत राहू असे म्हणताच शिंदे म्हणाले आता काय आमच्या हातात. घेणं न देणं. बाबा जेवले पतार पालथं असे म्हणताच कार्यक्रम जोरदार खसखस पिकली.

ब्वाॅ, या इकडं कापा सुपारी आणि द्या पान, एवढचं खातं चालूयं

आता काय आपल्या हातात द्यायला, दिलं तर खासदार देऊ शकतेत. आम्ही काय नाही. तुम्ही बोलायचं, आम्ही म्हणायचं ब्वाॅ  या इकडं कापा सुपारी आणि द्या पान एवढं खातं चालूयं आमच्याकडं. पान खाल्ल त्याच्यामुळं मी, सकाळ सकाळ जेवलो नाही तरी पान खा म्हणल्यावर खा म्हणलं आता काय घेता, घरचं सोडायचं आणि दुसर्‍याच्या दारात जाऊन बसायचं, कव्हा वाढता ? घ्या अशी आता आपली परिस्थिती झाली अशी वेदनाही राम शिंदे यांनी बोलून दाखवली.

पहा : माजी मंत्री राम शिंदे यांची चौफेर फटकेबाजी