लिलावती रूग्णालयात आमदार राम शिंदेंनी घेतली आमदार संजय शिरसाठ यांची भेट !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची आज मुंबईतील लिलावती रूग्णालयात भाजपा नेते तथा आमदार राम शिंदे यांनी भेट घेतली. शिंदे यांनी शिरसाट यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि लवकरात लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

MLA Ram Shinde met MLA Sanjay Shirsath at Lilavati Hospital

औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांना हृदय विकाराचा झटका आला होता.त्यांच्यावर औरंगाबादमधील खाजगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना तातडीने एअर ॲम्ब्यूलन्सने मुंबईला हलविण्यात आले होते. त्यांच्यावर सध्या मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

भाजपा नेते तथा विधानपरिषदेचे आमदार प्रा राम शिंदे यांनी आमदार संजय शिरसाट यांची लिलावती रुग्णालयात जाऊन भेट घेतली. शिंदे यांनी शिरसाट यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. शिरसाट हे लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी आमदार शिंदे यांनी सदिच्छा दिल्या.