Jamkhed BJP protests । ओबीसी आरक्षणावरून जामखेड भाजपकडून महाविकास आघाडी सरकारचा निषेध
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : ओबीसी समाजाचा विश्वासघात करून ओबीसी आरक्षण घालविणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज राज्यभरात अंदोलने केली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर जामखेड तालुका भाजपा ओबीसी सेल व भाजपाच्या सर्व आघाड्यांच्यावतीने जामखेडमध्ये अंदोलन करण्यात आले. जामखेडच्या तहसीलदारांना भाजपने निवेदन सोपवले.
सध्या राज्यातील काही जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुका होणार आहेत. या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडणार आहेत. यामुळे ओबीसी आरक्षणावरून भाजप आक्रमक झाली आहे. भाजपने आज बूधवारी रस्त्यावर उतरत महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदवला.
यावेळी पंचायत समिती सदस्य डाॅ भगवान मुरुमकर, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, उपसभापती रवी सुरवसे, सुधीर राळेभात,प्रविण चोरडीया, दत्ता राऊत, शरद कार्ले, मोहन गडदे, गौतम कोल्हे, अभिराजे राळेभात, काशिनाथ ओमासे, मनोज काका कुलकर्णी, प्रविण सानप, सोमनाथ राळेभात, बाजीराव गोपाळघरे, महेश मासाळ, लहू शिंदे, गणेश लटके, शिवकुमार डोंगरे, उमेश रोडे, रंगनाथ ठोंबरे, किशोर वाळके, एकनाथ हजारे, भारत अडसुळ, विजय कोकाटे, अर्जुन म्हेत्रे, सोशल मिडीया प्रमुख उध्दव हुलगुंडे चेअरमन सह आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालयात वकील का दिला नाही ? उद्या भाजपा उतरणार रस्त्यावर https://t.co/f5FMaJ9RGU@BJP4Maharashtra@BJP4Mumbai @Dev_Fadnavis @ChDadaPatil @RamShindeMLA @SachinPotare1
— Jamkhed Times (@JamkhedTimes) September 14, 2021