Road accident news today | जामखेड – अहमदनगर मार्गावर भीषण अपघात; 01 ठार
पिकअप व कारची समोरासमोर भीषण धडक; एक ठार चार जखमी
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड- अहमदनगर रस्त्यावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. या घटनेत एक जण ठार तर चार जण जखमी झाले आहेत. जामखेड – अहमदनगर मार्गावर अपघाताच्या घटना सतत घडत आहेत
भरधाव कार आणि पिकअपची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.हा अपघात जामखेड – अहमदनगर मार्गादरम्यानच्या आष्टी तालुक्यातील वाघळूज घाटात बुधवारी पहाटे झाला. (The accident took place in Waghluj Ghat on Wednesday morning)

भरधाव वेगाने अहमदनगरकडे जाणारी कार आणि अहमदनगरहून कड्याकडे येणारी पिकअप यांची समोरासमोर भीषण धडक झाली. ही धडक इतकी भयानक होती की,कारचा अक्षरशा: चक्काचूर झाला आहे.

यात कारमधील एक जण जागीच ठार झाला तर पिकअपमधील चार ते पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर अहमदनगर येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.घटनेत डाॅ व्यंकटेश नारायण बोराटे यांचा मृत्यू झाला आहे. ते आष्टी येथील रहिवासी असल्याचे समजते. सध्या ते पुण्यात वैद्यकीय व्यवसाय करत होते अशीही प्राथमिक माहिती समोर आली आहे.(Jamkhed-Ahmednagar Road accident news today,One killed, four injured)
अपघाताची माहिती मिळताच अंभोरा पो

लिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन जखमींना अहमनगर येथे उपचारासाठी हलविले असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक रोहित बेंबरे यांनी सांगितले.
राष्ट्रीय महामार्गावरील बीड ते नगर दरम्यान रोज कुठे ना कुठे अपघात होतात. धोकादायक वळण व घाटात कसलीच उपाययोजना संबंधित विभागाने केली नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढते आहे.
web title: Jamkhed Ahmednagar Road accident news today