Gaon Chalo Abhiyan : कर्जतमध्ये आमदार प्रा राम शिंदे यांनी हाती घेतलेय गाव चलो अभियान, अभियानला मिळतोय जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पार्टीने (BJP) कर्जत-जामखेड मतदारसंघात गाव चलो अभियान (Gaon Chalo Abhiyan) हाती घेतले आहे. या अभियानाद्वारे मोदी सरकारने (Modi Sarkar) मागील दहा वर्षांत राबवलेल्या विकास कामांची माहिती जनतेपर्यंत पोहचवली जात आहे. गाव चलो अभियानांतर्गत आमदार प्रा.राम शिंदे (MLA Prof. Ram Shinde) यांनी कर्जत तालुका (Karjat) पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. आमदार प्रा.राम शिंदे यांनी हाती घेतलेल्या गाव चलो अभियानाला जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. या दौर्‍यात शिंदे हे वेगवेगळ्या घटकांशी संवाद साधत आहेत.

In Karjat MLA Prof. Ram Shinde has taken up Gaon Chalo Abhiyan

भाजपने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील प्रत्येक बुथ मजबुत करण्यावर भर दिला आहे. त्यासाठी गाव चलो अभियान (Gaon Chalo Abhiyan) ही मोहिम राबवली जात आहे. भाजपच्या प्रत्येक नेत्यावर आणि कार्यकर्त्यांवर वेगवेगळ्या बुथची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ही मोहिम 4 ते 11 फेब्रुवारीपर्यंत कर्जत-जामखेड मतदारसंघात राबवली जाणार आहे. या मोहिमेला कर्जत तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे. भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या संकल्पनेतून “गाव चलो अभियान” (Gaon Chalo Abhiyan)देशभर राबविण्यात येत आहे. आमदार प्रा राम शिंदे यांनी या अभियानात सक्रीय सहभाग घेतला आहे.

गाव चलो अभियानात (Gaon Chalo Abhiyan) प्रत्येक बूथ पर्यत भाजप कार्यकर्त्यांने मुक्कामी राहत प्रवास करावयाचा आहे . केंद्र सरकारच्या दहा वर्षे च्या कामगिरीच्या अनुषंगाने प्रत्येक गावामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी कमीत कमी ३ बूथची जबाबदारी घेऊन प्रवास करायचा आहे . २४ तास त्या ठिकाणी प्रवास करावयाचा आहे . बूथ निहाय रचना, लाभार्थ्यांची भेट, महिला सबलीकरण, वैद्यकीय सुविधा, शेतकरी सन्मान योजना, अंत्योदय अशा विविध योजनांचा आढावा घेणे, विविध योजनेच्या लाभार्थींची भेट घेणे, सरकारी कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी या सर्व कर्मचार्यांची भेट घेणे.नमो अँप डाऊनलोड करणे, नमो चषक खेळांडूची नोंदणी करणे अशा विविध १८ उदिष्टावर या अभियानात काम केले जात आहे.

In Karjat MLA Prof. Ram Shinde has taken up Gaon Chalo Abhiyan

तळागाळातील प्रत्येक मतदारापर्यंत मोदी सरकारचे गेल्या दहा वर्षांतील प्रभावी कार्य, मागच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांची केलेली पूर्ती, विकसित भारताचा संकल्प सांगणाऱ्या यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी ही सर्व माहिती पोहोचवण्याच्या उद्देशाने हे अभियान हाती घेण्यात आले आहे.याच पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यात आमदार प्रा राम शिंदे यांच्या गाव चलो अभियान दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यांनी कर्जत जामखेड मतदार संघातील कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील बूथ क्र १, २, ३ या बूथ मध्ये प्रवास केला . मोदींची गॅरंटी काय आहे हे प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी मोदी सरकारच्या योजना व उल्लेखनीय कामगिरीची माहिती प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवणे हे Gaon Chalo Abhiyan या अभियानाचे उद्दिष्ट असल्याची माहिती आ प्रा राम शिंदे यांनी यावेळी दिली.

In Karjat MLA Prof. Ram Shinde has taken up Gaon Chalo Abhiyan

दरम्यान आ शिंदे यांनी तालुक्यातील निमगाव गांगर्डा गावचा प्रवास करत गावात मुक्काम केला, यावेळी त्यांनी गावातील वाड्यावस्त्यावर जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधला तसेच ग्रामस्थांसोबत एकत्रितपणे स्नेहभोजन केले, गावातील ग्रामस्थांशी संवाद साधत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकोपयोगी योजनांची माहिती त्यांना दिली. गावातील महिला बचत गटाच्या महिलांनी शिंदे यांच्याशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात महिला सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती शिंदे यांनी महिलांना दिली. तसेच, प्रधानमंत्री आवास योजना आणि पीएम किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. अनुसूचित जातीचे घरकुल योजनेचे लाभार्थी यांची भेट घेतली.विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांची भेट घेतली.मनसेचे कर्जत तालुकाध्यक्ष सचिन सटाले यांची आमदार शिंदे यांनी सदिच्छा भेट घेतली. ( Gaon Chalo Abhiyan)

In Karjat MLA Prof. Ram Shinde has taken up Gaon Chalo Abhiyan

स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, सहकारी संस्थांचे प्रतिनिधि, विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांच्या भेटी घेऊन संवाद करत योजनांची माहिती दिली. दिवार लेखन उपक्रमा अंतर्गत बार बार मोदी सरकार असे भित्ती लेखन करत कार्यक्रमाचा समारोप केला . या संपूर्ण प्रवासामध्ये आमदार शिंदे यांच्यासोबत समवेत गटातील बूथ प्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ वॉरिअर तालुकाध्यक्ष श्री शेखर खरमरे आवर्जून उपस्थित होते. ( Gaon Chalo Abhiyan)

या प्रवासात अंबादास पिसाळ, काकासाहेब तापकीर, अँड श्री शिवाजी अनभुले, अशोक खेडकर, सचिन पोटरे, डॉ सुनील गावडे, दत्ता मुळे, नंदलाल काळदाते, काका धांडे, गणेश पालवे, अनिल गदादे, पंडाराजे बोरुडे, बजरंग कदम, नंदकुमार नवले, तात्या खेडकर, राहुल गांगर्डे, संजय तापकीर, शिवाजी वायसे, आदि कार्यकर्त्यांनी आमदार शिंदे यांची भेट घेतली . या अनोख्या उपक्रमांचे कुतुहल गावकऱ्यासह पक्षीय कार्यकर्त्यांना ही होते त्यामुळे या प्रवासात बहुसंख्य कार्यकर्त्यांनी भाग घेतला . उर्वरित बूथ वरील कार्यकर्त्यांचा प्रवास दि . ८ तारखेपासून सुरु झालेला आहे . सर्व प्रवासाचे अपडेट हे नमो अँप वर अपलोड करण्यात येत आहेत . या प्रवासा दरम्यान सर्व नोंदी प्रदेश कार्यालयाकडे पाठविण्यात येत आहेत, अशी माहिती कर्जत भाजपचे तालुकाध्यक्ष शेखर खरमरे यांनी दिली. ( Gaon Chalo Abhiyan)