zyber 365 Pearl Kapur Net Worth : भारतातील सर्वात तरूण उद्योगपती बनला 9 हजार 800 कोटींचा मालक ! कोण आहे पर्ल कपूर ? जाणून घ्या सविस्तर !
zyber 365 Pearl Kapur Net Worth News in Marathi : गर्भ श्रीमंत व्हावं असं अनेकांचं स्वप्न असतं, पण ते स्वप्न मोजक्याच लोकांच्या नशिबी येतं. सध्या तरूणांमध्ये झटपट श्रीमंत होण्याची क्रेझ वाढली आहे. तरूणांमध्ये नवनवे उद्योग निर्माण करण्याची क्रेझ आहे. नाविन्यपूर्ण कल्पना राबवून उद्योग उभारले जात आहेत. देशात सध्या एका तरूण उद्योगपतीची जोरदार चर्चा रंगली आहे. त्याला कारण ठरलीय त्याने 3 महिन्यात कमवलेली करोडोंची संपत्ती !

भारतासह जगभरात चर्चेत आलेल्या त्या तरूण उद्योजकाचं नाव आहे पर्ल कपूर, पर्ल कपूर (Pearl Kapur) या तरूण उद्योगपतीचं वय अवघं 27 वर्षांचं आहे. (Pearl Kapur age 27 year old) पर्ल कपुरने अवघ्या तीन महिन्यात $1.1 बिलियन (9.128 कोटी ) रूपये आपल्या कंपनीच्या माध्यमांतून कमावले आहेत. भारतातील सर्वात तरूण अब्जाधीश म्हणून त्याची आता ओळख निर्माण झाली आहे. जाणून घेऊयात त्याचीच ही गोष्ट ! (Pearl Kapur Net Worth)
Zylber 365 कंपनी स्थापनेच्या पुर्वी पर्ल कपूर हे antier solution या कंपनीसाठी आर्थिक व व्यवसाय सल्लागार म्हणून काम पाहत होते. Zylber 365 या कंपनीच्या स्थापनेपूर्वी पर्ल कपूर यांनी बिलियन पे टेक्नाॅलाॅजीज ही कंपनी फेब्रुवारी 2022 मध्ये स्थापन केली होती. त्यानंतर पर्ल कपूर या तरूण उद्योजकाने 2023 साली zyber 365 ही कंपनी स्थापन केली.
Pearl Kapur Net Worth : पर्ल कपूर नेट वर्थ
Web3 या क्षेत्रात ते सध्या काम करत आहेत. अल्पावधीतच त्यांनी या क्षेत्रात जम बसवलाय. AI ची वाढत्या क्रेझने त्यांना या उद्योगात आणले. Zylber 365 या कंपनीचे 90% शेअर्स पर्ल कपूर (Pearl Kapur) याच्याकडे आहेत. सध्या कंपनीची संपत्ती 9 हजार 128 कोटी इतकी झाली आहे. कंपनीने प्रतिष्ठित युनिकाॅर्न दर्जा मिळवला आहे. अवघ्या एका वर्षात पर्ल कपूरने Zylber 365 च्या माध्यमांतुन मारलेली भरारी देशभर चर्चेचा विषय ठरली आहे.