जामखेड भाजपने साजरा केला गुजरात विधानसभा निवडणुकीतील विजयाचा जल्लोष !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : भारतीय जनता पार्टीने गुजरात विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचा जामखेड शहरात फटाके फोडून आणि पेढे वाटून जामखेड भारतीय जनता पार्टीच्या वतीने जल्लोष करण्यात आला.

BJP's jubilation in Jamkhed after victory in Gujarat assembly elections

गुजरातमध्ये भाजपने घवघवीत यश मिळवताच जामखेड भाजपच्या कार्यकर्त्यांनी शहरातील पुढारी वडासमोर एकत्र येत फटाक्यांची आतिषबाजी करत ऐकमेकांना पेढे भरवून विजयोत्सव साजरा केला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचा विजय असो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजय असो, अश्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता.

BJP's jubilation in Jamkhed after victory in Gujarat assembly elections

यावेळी भाजपचे शहराध्यक्ष बिभीषण धनवडे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले, पांडुरंग उबाळे, महारूद्र महारनवर, लहू शिंदे, नगरसेवक गणेश आजबे, मोहन मामा गडदे, गोरख घनवट, पप्पू काशिद, तान्हाजी फुंदे, बाळासाहेब गायकवाड, उध्दव हुलगुंडे, तुषार बोथरा, आण्णासाहेब वायसे, शैलेश कदम, बाळासाहेब गायकवाड, अशोक मोरे, ऋषिकेश मोरे, पांडुराजे मोरे सह आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.