जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ मोठी खड्डे पडले आहेत. या रस्त्यांची तातडीने दुरूस्ती व्हावी याकरिता भाजपा युवा मोर्चाच्या वतीने नगर रोडवरील विंचरणा नदीच्या पुलाजवळ रस्त्यावरील खड्ड्यात ऐरंडाचे झाड लावत बांधकाम विभागाचा निषेध करत रस्त्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचे अंदोलन करण्यात आले.
अगामी दहा दिवसांत जामखेड शहरातील प्रमुख रस्त्यांवर पडलेल्या रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा भाजपच्या वतीने देण्यात आला आहे. हे अंदोलन युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
या अंदोलनात पंचायत समिती सदस्य डॉ भगवान मुरुमकर,उपाध्यक्ष मोहन गडदे, शिवकुमार डोंगरे शहर अध्यक्ष आभिराजे राळेभात,अर्जुन म्हेत्रे,प्रविनसानप, काशिनाथ ओमासे, सोमनाथ राळेभात,महेश मासाळ, नगरसेवक मा संदीप गायकवाड, नगरसेवक गणेश आजबे, बबन ढवळे, तात्याराम पोकळे, पिंटु माने, पप्पु काशिद, आबा आमटे, ईश्वर हुलगुंडे, मोहन देवकाते, विक्रांत घायतडक,संतोष गव्हाळे, कुनाल समुद्र, शिवम घायतडक, सागर बोराटे, लखन जाधव, विनोद वानी, अक्षय विधाते, युवराज निमोनकर, अनिकेत जाधव, राहुल पवार, रोहीत कार्ले, अजय सातव, अशिष कार्ले, प्रविन कार्ले, वैभव कार्ले सह आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.
यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरील खड्ड्यात झाडे लावून बांधकाम विभागाचा निषेध केला. यावेळी रस्ता दुरूस्तीच्या मागणीचे निवेदन सहायक पोलीस निरीक्षक महेश जानकर व उप अभियंता संजय कांबळे यांना देण्यात आले.