Ajit Pawar’s warning | अजित पवारांचा इशारा : सर्वच बंद करण्याची वेळ आणू नका

विरोधकांनी भावनिक राजकारण थांबवले पाहिजे - पवार

 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : ग्रामीण भागात लोकांच्या मनात कोरोनाची आता भीतीच राहिली नाही. बरेच नागरिक मास्क वापरत नाहीत. नियम पाळले जात नाहीत. याबाबत मुख्यमंत्र्यांनी आवाहन करूनही यामध्ये काहीजण सार्वजनिक सण, उत्सव साजरे करून भावनिक राजकारण करीत आहेत.हे कोठेतरी थांबले पाहिजे.पुन्हा कोरोनाची तिसरी लाट आल्यास सर्वच बंद करण्याची वेळ राज्य सरकार आणि प्रशासनावर आणू नका असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. (Ajit Pawar’s warning)

महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. भाजप आणि मनसे राज्यात मंदिरे सुरू करण्याबाबत आक्रमक झाली आहेत. पवार म्हणाले, ”कोणी किती आक्रमक व्हावे, हा त्यांचा प्रश्न आहे. येत्या काही महिन्यांत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे स्वतःचे अस्तित्व दाखविण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करणार. सध्या मंदिरे सुरू करण्याचा भावनिक मुद्दा उपस्थित करून काही साध्य करता येईल का, याचा प्रयत्न विरोधक करीत आहेत अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

शाळा कधी सुरू होणार ?

देशातील काही इतर राज्यांमध्ये शाळा सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्रातील शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकारची भूमिका काय, या संदर्भात पवार म्हणाले, कोरोनामुळे सध्या दिवाळीनंतर शाळा सुरू कराव्यात, असा एक मतप्रवाह आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णदर शून्यावर आल्यानंतरच शाळा सुरू कराव्यात असा दुसरा मतप्रवाह आहे. याबाबत मुख्यमंत्री टास्क फोर्सच्या तज्ज्ञांशी चर्चा करून शाळा नक्की कधी सुरू करायच्या याबाबत अंतिम निर्णय घेतील.

सर्वच बंद करण्याची वेळ आणू नका – Ajit Pawar’s warning

ग्रामीण भागात लोकांच्या मनात कोरोनाची आता भीतीच राहिली नाही. बरेच नागरिक मास्क वापरत नाहीत. नियम पाळले जात नाहीत. याबाबत मुख्यमंत्र्यांनी आवाहन करूनही यामध्ये काहीजण सार्वजनिक सण, उत्सव साजरे करून राजकारण करीत आहेत. हे कोठेतरी थांबले पाहिजे. पुन्हा कोरोनाची तिसरी लाट आल्यास सर्वच बंद करण्याची वेळ राज्य सरकार आणि प्रशासनावर आणू नका असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.

web title: Ajit Pawar’s warning, don’t bring closing time