Ashok Chavhan Latest News in Marathi : अशोक चव्हाण यांनी काँग्रेस का सोडली? नेमकं कारण काय ? जाणून घ्या सविस्तर !
Ashok Chavhan Latest News in Marathi : महाराष्ट्राला अपेक्षित नसतील असे राजकीय भूकंप होणार असा दावा सातत्याने भाजप नेत्यांकडून केला जात होता, आता हा दावा खरा ठरत असल्याचे दिसत आहे. काँग्रेस पक्षात सोमवारी मोठा राजकीय भूकंप झाला. काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पंजाची साथ सोडली. चव्हाण यांनी काँग्रेस पक्षासह आमदारकीचा राजीनामा दिला. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस का सोडली ? जाणून घेऊयात सविस्तर ! (Ashok Chavhan Latest News in Marathi)

नांदेडचे अशोक चव्हाण हे राज्याचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र आहेत. जन्मापासून काँग्रेस पक्षात असलेल्या अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविलेले आहे. महाराष्ट्र काँग्रेसमधील सर्वात मातब्बर नेते म्हणून चव्हाण यांची ओळख आहे. सध्या देशभर लोकसभा निवडणूकीचे वारे जोरात वाहत आहे. सर्व राजकीय पक्ष या निवडणुकीच्या तयारीत गुंतले आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची निवडणूक तयारी जोरात सुरु आहे. जागावाटपाच्या बैठकांचे सत्र सुरु आहे. या बैठकांमध्ये काँग्रेस पक्षाकडून चर्चेसाठी अशोक चव्हाण व इतर नेत्यांचा सहभाग असायचा, त्यातील अशोक चव्हाण यांनी आज काँग्रेसचा राजीनामा दिला. महाविकास आघाडीला सुरुंग लावला. (Ashok Chavhan Latest News in Marathi)
अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची देशभर चर्चा रंगली आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्याने काँग्रेसला तगडा झटका बसला आहे. रामजन्मभूमी प्राणप्रतिष्ठेचा सोहळ्याच्या आधी अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये लावलेल्या डिजिटल फलक चर्चेत आले होते.या फलकावरून काँग्रेसचे चिन्ह आणि नेत्यांचे फोटो गायब होते. त्यावर फक्त प्रभू श्री राम यांचा फोटो आणि अशोक चव्हाण यांचे नाव आणि फोटो होते. तेव्हापासूनच अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात होता. आज अशोक चव्हाण यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. दोन दिवसांत पुढील निर्णय घेऊ असे त्यांनी जाहीर केले आहे. चव्हाण यांचा भाजपातील प्रवेश ही आता औपचारिक बाब राहिली असल्याचे बोलले जात आहे.
Ashok Chavhan Latest News in Marathi मला कोणाचीही तक्रार करायची नाही
नाराजीचं कारण काय या प्रश्नावरही ते बोलले नाहीत. ‘मला कोणाचीही तक्रार करायची नाही. पक्षांतर्गत गोष्टी बाहेर काढायच्या नाहीत. कुणाचीही उणीदुणी काढायची नाहीत. तो माझा स्वभाव नाही,’ असं अशोक चव्हाण म्हणाले. भाजपकडून राज्यसभेवर पाठवलं जाणार असल्याची चर्चेवरही चव्हाण यांनी मत मांडलं. ‘मी कुठल्याही पक्षाच्या संपर्कात नाही. कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. मला निर्णय घेण्यासाठी वेळ हवा आहे. येत्या दोन दिवसांत माझा निर्णय जाहीर करेन, असं चव्हाण यांनी सांगितलं. (Ashok Chavhan Latest News in Marathi)