Ashok Chvhan Breaking News : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उचलले मोठे पाऊल, काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का !

Ashok Chvhan Breaking News : महाराष्ट्राच्या राजकारणातून आज पुन्हा एकदा एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारा मोठे पाऊल उचलले. त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे. अशोक चव्हाण हे काँग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा होती. चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

Ashok Chavan Breaking News, Big step taken by former Chief Minister Ashok Chavan, another big blow to Congress,

सोमवारी काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवल्याची माहिती समोर येत आहे. चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा का दिला? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. दरम्यान चव्हाण यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना सोपवला असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.

मध्यंतरी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव दौऱ्यामध्ये असताना महाराष्ट्राला अपेक्षित नसतील असे राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा केला होता. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी फूट पडल्यानंतर आता काँग्रेस पक्षालाही गळती लागल्याचे दिसू लागले आहे. महाजन यांनी केलेल्या दाव्यानुसार काँग्रेस ज्येष्ठ नेते आता पक्षांतराच्या तयारीत असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशभर हाती घेतलेल्या भारत जोडो न्याययात्रा लवकरच महाराष्ट्रात धडकणार आहे त्याआधीच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकीय भूकंप घडण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याने काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. अशोक चव्हाण यांच्या नंतर काँग्रेस मधील इतर कोणते मोठे नेते पक्षाला रामराम ठोकणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार उल्हास पाटील माजी मंत्री बाबा सिद्दिकी, राजेंद्र नागवडे या काँग्रेसच्या नेत्यांनी गत आठवड्यात पक्षाला राम राम ठोकला आहे, आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात उडाली आहे.

अशोक चव्हाणांचा आमदारकीचा राजीनामा ?

राहुल नार्वेकर यांची भेट घेण्याआधी महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. अजूनही कुणीही स्पष्ट केलं नाहीय की अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे. राजीनाम्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करतील असं सांगण्यात येतंय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर येतील तेव्हा ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

अशोक चव्हाण यांच्या राजीमाम्याची चर्चा असतानाच ते नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. ते मुंबईतच असून आज सकाळी त्यांनी विधानसभा अधक्ष नार्वेकर यांची भेट घेतली. त्यानंतर विविध चर्चाना उधाण आले. ते भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने त्यांच्या राजकिय भूमिकेबाबत संशय निर्माण झाला आहे. गेले काही दिवसांपासून अशोक चव्हाण हे भाजपात जाणार असल्याची चर्चा सातत्याने होत होती अखेर ही चर्चा आता खरी ठरताना दिसत आहे.

तर दुसऱ्या बाजूला मुंबईत भाजपच्या प्रदेश कार्यालयात हालचालींना वेग आला आहे. भाजप प्रदेश कार्यलय मध्ये मंत्री मंगलप्रभात लोढा , मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, आमदार पराग अळवणी कार्यालय मध्ये दाखल झाले आहेत.