मोठी बातमी 12 BJP MLAs suspended | तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी भाजपचे 12 आमदार निलंबित

मुंबई : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस गाजला तो गदारोळाने. अधिवेशन दोनच दिवसाचे असतानाही विरोधी पक्षाकडून मोठा गोंधळ घालण्यात आला. ओबीसी आरक्षण विषयावर सभागृहात मोठा गोंधळ झाला. याचवेळी भाजपच्या काही आमदारांनी तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की केल्याची घटना घडली याप्रकरणी प्रकरणी भाजपचे 12 आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. या निर्णयाचे जोरदार पडसाद विरोधी गटाकडून उमटू लागले आहेत. आरोप प्रत्यारोपांच्या तोफा आता भलत्याच धडाडू लागल्या आहे (12 BJP MLAs suspended for pushing table president)

भाजपच्या या आमदारांना करण्यात आले निलंबित (12 BJP MLAs suspended )

 1. डॉ. संजय कुटे, जामोद, जळगाव
 2. आशिष शेलार, वांद्रे पश्चिम
 3. अभिमन्यू पवार, औसा, लातूर
 4. गिरीश महाजन, जामनेर, जळगाव
 5. अतुल भातखळकर, कांदिवली पूर्व, मुंबई
 6. पराग अळवणी, विलेपार्ले, मुंबई
 7. हरिश पिंपळे, मूर्तिजापूर, अकोला
 8. राम सातपुते, माळशिरस, सोलापूर
 9. जयकुमार रावल, सिंदखेडा, धुळे
 10. योगेश सागर, चारकोप, मुंबई
 11. नारायण कुचे, बदनापूर, जालना
 12. कीर्तिकुमार भांगडिया, चिमूर, चंद्रपूर