OBC Reservation | कलगीतुरा | भुजबळांनी सुनावले फडणवीसांना खडे बोल : म्हणाले ओबीसींचा आशिर्वाद घ्या !
मुंबई : ओबीसी आरक्षणासाठी (OBC reservation) केंद्र सरकारकडून इम्पिरिकल डाटा (Empirical data) मिळावा असा ठराव आज सरकारने पावसाळी अधिवेशनात पारित केला. चर्चेदरम्यान सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा पाहायला मिळाला. हा प्रस्ताव राजकीय आहे, या ठरावाने ओबीसींना आरक्षण मिळणार नाही, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Opposition leader Devendra Fadnavis) यांनी केला. तर फडणवीसांच्या आरोपाला उत्तर देताना ओबीसींच्या आरक्षणासंबंधी सरकारच्या प्रयत्नांना पाठिंबा द्या, ओबीसींचे आशीर्वाद घ्या असे खडे बोल अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Minister of Food and Civil Supplies Chhagan Bhujbal) यांनी सुनावले. चर्चेदरम्यान मोठा गदारोळ उडाला होता. (thackeray Government Proposed OBC reservation proposal Empirical Data)
The government today passed a resolution in the monsoon session seeking Empirical data from the central government for OBC reservation. During the discussion, there was a flurry of strong allegations between the ruling party and the opposition. Opposition leader Devendra Fadnavis claimed that the proposal was political and would not give reservation to OBCs.While replying to the allegations of Fadnavis, Chhagan Bhujbal said, “Support the efforts of the government regarding the reservation of OBCs and seek the blessings of OBCs.” There was a great commotion during the discussion.
पॉलिटिकल इंम्पिरिकल डाटा केवळ राज्य सरकार गोळा करू शकतं, असं म्हणत राज्य सरकारने आणलेला ठराव हा पूर्णतः चुकीचे असल्याचं मत देवेंद्र फडणवीस यांनी मांडलं. सरकारने ओबीसींची दिशाभूल केली. या ठरावाने ओबींसींना आरक्षण मिळणार नाही. आम्ही सरकारचा विधानसभेत बुरखा फाडला, आणखी बुरखा फाटू नये म्हणून विधानसभेत सत्ताधारी पक्षाने वेगळं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप फडणवीस यांनी केला. The government today passed a resolution in the monsoon session to get empirical data from the central government for OBC reservation.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेत इम्पिरीकल डेटा केंद्राने देण्याचा ठराव मांडला. बराच प्रयत्न करूनही ओबीसींचा डेटा मिळाला नाही. त्यामुळे हा ठराव मांडत असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं. भुजबळ यांनी मांडलेल्या प्रस्तावाची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चिरफाड केली. तसेच या डेटाला आमचा पाठिंबा असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी हा ठराव मंजुरीसाठी टाकला. यावेळी विरोधकांनी हौदात येऊन प्रचंड गदारोळ केला. या गदारोळातच तालिका अध्यक्षांनी ठराव मंजूर केला. त्यानंतर दहा मिनिटांसाठी विधानसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं.The government today passed a resolution in the monsoon session to get empirical data from the central government for OBC reservation.
मुंबई: ओबीसींचा इम्पिरीकल डेटा केंद्र सरकारने देण्यासाठी आज विधानसभेत ठराव मांडण्यात आला. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी हा ठराव मांडला. त्यावर हा केवळ राजकीय ठराव असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मात्र, विरोधकांच्या गदारोळातच हा ठराव मंजूर करण्यात आला. (The government today passed a resolution in the monsoon session to get empirical data from the central government for OBC reservation.