Best Tourism Village Contest | UNWTO च्या ‘बेस्ट टुरिझम व्हिलेज कॉन्टेस्ट’ साठी 3 भारतीय गावांचा समावेश !

दिल्ली : भारत हा निसर्ग सौंदर्याने नटलेला देश आहे. जागतिक पर्यटनाच्या दृष्टीने दरवर्षी भारतातील विविध पर्यटन स्थळांना भेट देणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या वाढत आहेत. देशांतर्गत पर्यटनातही वाढ होताना दिसत आहे.अश्यातच भारतासाठी पर्यटन क्षेत्रातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. युनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन (United Nations World Tourism Organization) UNWTO अवॉर्डसाठी बेस्ट टुरिझम व्हिलेजच्या कॅटगरीमध्ये भारतातील तीन गावांचा समावेश करण्यात आला आहे. (UNWTO includes 3 Indian villages for Best Tourism Village Contest )

यापुर्वी मेघालयातील कोंगथोंग गावाला या यादीत स्थान मिळाले होते आता मध्य प्रदेशातील लधपूरा खास (Ladhpura Khas) आणि तेलंगणातील पोचमपल्ली गावाची (Telangana Pochampalli village) नावेही समाविष्ट आहेत. त्यानुसार भारतातील तीन गावांचा समावेश UNWTO ने केला आहे.पर्यटन स्थळाच्या दृष्टीने ही गावे पर्यटकांना खूप आवडतात.

Best Tourism Village Contest

युनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन (UNWTO) अवॉर्डसाठी बेस्ट टुरिझम व्हिलेजच्या कॅटगरीमध्ये आपल्या राज्यातील गावाने स्थान पटकाविल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. यात म्हटले आहे की, ‘मध्य प्रदेशातील लाधपुरा खास गावाचा’ बेस्ट टुरिझम व्हिलेज ‘मध्ये प्रवेश करणे आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. या कामगिरीसाठी मध्य प्रदेश पर्यटन आणि प्रशासनाच्या संपूर्ण टीमला माझ्या शुभेच्छा. असेच चांगले काम करत राहा.

मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा (Meghalaya Chief Minister Konrad Sangma) यांनीही ‘बेस्ट टुरिझम व्हिलेज’मध्ये Best Tourism Village कोंगथोंग गावची नियुक्ती झाल्यावर ट्विट करून आनंद व्यक्त केला आहे. संगमा यांनी म्हटले आहे. ‘मेघालयच्या कोंगथोंग गावाला भारताच्या इतर दोन गावांसह UNWTO च्या सर्वोत्तम पर्यटन गावांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. (UNWTO includes 3 Indian villages for Best Tourism Village Contest )

लाधपुरा खास (Ladhpura Khas) हे गाव मध्यप्रदेशातील टीकमगढ जिल्ह्यातील ओरछा तालुक्यात आहे.(Madhya Pradesh, Tikamgarh District, Orchha Taluka) याबाबत अधिक माहिती देताना पर्यटन आणि संस्कृतीचे प्रधान सचिव शेखर शुक्ला म्हणाले की, राज्याच्या ‘ग्रामीण पर्यटन प्रकल्प’ अंतर्गत पुढील पाच वर्षांत 100 गावे विकसित केली जातील.

मेघालयातील शिलाँगपासून सुमारे 60 किमी अंतरावर स्थित कोंगथोंग (Meghalaya Kongthong village) गाव त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि वेगळ्या संस्कृतीसाठी खूप लोकप्रिय आहे. हे गाव ‘व्हिसलिंग व्हिलेज (Whistling Village) या नावानेही प्रसिद्ध आहे. हे 12 गावांपैकी एक आहे जिथे एका विशिष्ट प्रकारचा ‘आवाज’ मुलाशी त्याच्या जन्मापासूनच जोडला जातो. हा आवाज आयुष्यभर त्याच्यासोबत राहतो. ही परंपरा आजही कायम आहे.