- Advertisement -

Terrible Accident MP : भयंकर दुर्घटना ४० लोक पडले विहिरीत : चौघांचा दुर्दैवी मृत्यू

मध्य प्रदेशातील विदिशा इथं गुरुवारी रात्री घडली भीषण दुर्घटना

मध्यप्रदेश : मध्यप्रदेश राज्यातून एक भीषण दुर्घटना आता समोर आली आहे. (Terrible accident MP) विहिरीत पडलेल्या मुलाच्या बचाव कार्यादरम्यान विहिरीचा कठडा तुटल्यामुळे जवळपास ४० लोक विहिरीत पडल्याची दुर्घटना समोर आली आहे. या घटनेत चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आतापर्यंत विहीरीतून २० जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. मध्य प्रदेशातील विदिशा इथं गुरुवारी रात्री ही भीषण दुर्घटना घडली.या घटनेमुळे देशात हळहळ व्यक्त केली जात आहे .

मध्य प्रदेशमधील विदिशा (Vidisha) जिल्ह्यातील गंजबासौदामध्ये ३० ते ४० लोक विहिरीमध्ये पडल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेतून २० जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. घटनास्थळी NDRF, पोलीस आणि एसडीआरएफची टीम दाखल झाली असून मदतकार्य सुरू आहे. (Terrible accident MP)

चर्चेतल्या बातम्या

गंजबासौदामधील लालपठार गावात ही घटना घडली आहे. विहिरीमध्ये एक मुलगा पडला होता. त्याला बाहेर काढण्यासाठी गावातील इतर लोकांनी धाव घेतली होती. पण, मुलाला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात गावातील काही तरुण विहिरीत पडले. विहिरीजवळ मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. विहिरीच्या कठड्याभोवती लोक गोळा झाली होती. त्याचवेळी विहिरीच्या आजूबाजूची जमीन घसरली आणि अनेक लोकं विहिरी पडली. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे.(Terrible accident MP)

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चव्हाण यांनी मदतीची घोषणा केली आहे. (Terrible accident MP)