New Zealand 1st innings All Out 62 runs | भारताच्या धारदार गोलंदाजीसमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांची हाराकिरी; अवघ्या 62 धावांत संपुर्ण संघ तंबूत

New Zealand 1st innings All Out 62 runs| जामखेड टाईम्स वृत्तसेवा :  क्रिकेट या खेळात कधी काही चमत्कार होईल हे सांगता येत नाही. एजाज पटेल (Ajaz Patel 10 Wicket) या न्यूझीलंडच्या गोलंदाजाने भारताचा डाव गुंडाळून विश्वविक्रमाला गवसणी घालण्याची किमया केलेली असतानाच वानखेडे स्टेडियमवरून (Mumbai Wankhede Stadium) आणखी एक धमाकेदार बातमी समोर आली आहे.(New Zealand’s 1st innings All Out 62 runs)

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत विरूध्द न्यूझीलंड (India Vs New Zealand 2nd Test Match) यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू आहेत.भारताने पहिल्या डावात 325 धावा केल्या. न्यूझीलंडच्या एजाज पटेल या गोलंदाजाने 10 गडी बाद करत भारताचा संघ तंबूत धावण्याची किमया करत मुंबई कसोटीचा दुसरा दिवस गाजवला.

न्यूझीलंड संघ मैदानात फलंदाजीसाठी उतरला खरा पण न्यूझीलंड संघाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर अक्षरश: शरणागती पत्करली.मुंबई कसोटीत न्यूझीलंड संघ पहिल्या डावाच्या फलंदाजीसाठी मैदानात उतरला पण अवघ्या 62 धावांत संपुर्ण संघ गारद झाला. न्यूझीलंडचा डाव पत्त्याच्या बंगल्या प्रमाणे कोसळला. भारताने दुसर्‍या कसोटीवर मजबूत पकड मिळवली आहे. भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला अवघ्या 62 धावांत गारद केले.

न्यूझीलंडचा पहिल्या डावात उडाला धुव्वा

न्यूझीलंडकडून टाॅम लॅथम14 धावा, विल यंग 04 धावा, डॅरिल मिशेल 08 धावा, राॅस टेलर 01 धाव, हेन्री निकोल्स 07 धावा, टॉम ब्लंडेल 08 धावा, रचिन रविंद्र 04, काइल जेमिसन 17, टीम साऊथी 0 धावा,  विल्यम सोमरविले 0 धावा, एजाज पटेल नाबाद 0 अशी लाजिरवाणी धावसंख्या न्यूझीलंडकडून करण्यात आली. (New Zealand 1st innings All Out 62 runs)

भारतीय गोलंदाजी

मुंबई कसोटीत न्यूझीलंडचा संघ फलंदाजीस मैदानात उतरल्यानंतर भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज या गोलंदाजाने दोन झटपट विकेट मिळवून दिल्यानंतर भारतीय संघ जोशात आला. मग भारतीय गोलंदाजांनी सामन्यावर मजबुत पकड मिळवत न्यूझीलंडच्या संघाच्या फलंदाजांना जेरीस आणले. भारताकडून मोहम्मद सिराजने 3 गडी बाद केले, उमेश यादवने 2 गडी बाद केले, अक्षर पटेलने 3 गडी बाद केले, आश्विनने 2 बळी घेतली.

भारताचा दुसरा डाव सुरू

न्यूझीलंडला फाॅलोऑन न देता भारताने दुसर्‍या डावाची सुरूवात केली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा भारतीय संघाने दुसऱ्या डावात 27 धावा केल्या आहेत. चेतेश्वर पुजारा 16 धावांवर तर मयंक अग्रवाल 11 धावांवर खेळत आहेत. भारताला दुसरी कसोटी जिंकण्याची मोठी संधी आहे.