Karjat News | कर्जत पोलिस दलाची दबंग कामगिरी : पोलिस अधीक्षकांनी केले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सन्मानित !

 

 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : Karjat News|  विविध गंभीर गुन्ह्यांचा सखोल तपास करीत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पोलीस अधीक्षक मनोज पाटील (Superintendent of Police Manoj Patil) यांनी कर्जत पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित केले. यावेळी कर्जतचे उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव (DYSP Annasaheb Jadhav) उपस्थित होते.

कर्जत पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत.काही घटनेचा तपास पोलीस विभागासाठी मोठे आव्हानच ठरत असते. अशा गुन्ह्यात पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आपली तहान-भूक विसरून त्याचा सखोल तपास करून खऱ्या गुन्हेगारांना जेरबंद करतात. वेळप्रसंगी जीवावर उदार होत ते आपली कामगिरी बजावत असतात. पोलिस तपासात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांना सन्मानित करण्यात आले.

Karjat News

यांचा करण्यात आला सन्मान

कर्जत पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव (Police Inspector Chandrshekhar Yadav)  पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे, भगवान शिरसाठ यांच्यासह पोलीस कर्मचारी सुनील माळशिखरे, तुळशीराम सातपुते, पांडुरंग भांवडलकर, भाऊ काळे, विकास चंदन, गणेश भागडे, संपत शिंदे, भाऊसाहेब यमगर, बबन दहिफळे, प्रबोध हंचे, सुनिल खैरे, अमित बरडे, महादेव कोहक, जितेंद्र सरोदे, रवी वाघ, ईश्वर माने, सचिन वारे, गणेश आघाव, शामसुंदर जाधव, गोवर्धन कदम तसेच महिला पोलीस कर्मचारी राणी पुरी, जयश्री गायकवाड, कोमल गोफणे यांना सन्मानित करण्यात आले.

Karjat News

कर्जत पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या खालील गुन्ह्यांचा कर्जत पोलिसांनी वेगाने तपास करत मुद्देमाल हस्तगत करण्याची धडाकेबाज कारवाई केली होती.

गुरनं. २८४/२०२१ भा.दं.वि. कायदा कलम ३९५

गुरनं. २१३/२०२१ भादंवि कलम ३०७

गुरनं. २८९/२०२१ भादंवि कलम ४५४,३८०

गुरनं ४९९/२०२१ भादंवि कलम ४५७,३८०,४६९

गुरनं. ४४२/२०२१ भादंवि कलम ४५७,३८०

गुरनं. १९/२०२१ भादंवि कलम ४२०,४०६

या गुन्ह्याचा सखोल तपास करुन खऱ्या आरोपींना अटक केली होती. तसेेेच मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले होते. त्यांच्या याच कामगिरीचा आढावा घेत पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी उपअधीक्षक कार्यालय कर्जत येथे विशेष सन्मानपत्र देत गौरव केला.