India Vs New Zealand 2nd Test Match Mumbai 2021 Ajaz Patel equals Anil Kumble and Jim Lakers world record | न्यूझीलंडच्या एजाज पटेलचा वर्ल्ड रेकॉर्ड धमाका : जीम लॅकर (1956)आणि अनिल कुंबळेच्या (1999) विश्वविक्रमाची केली बरोबरी

India Vs New Zealand 2nd Test Match Mumbai 2021Ajaz Patel equals Anil Kumble and Jim Lakers world record

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर ( Mumbai Wankhede Stadium) खेळल्या जात असलेल्या भारत विरूध्द न्यूझीलंड (India Vs New Zealand 2nd Test Match Mumbai 2021)  दुसर्‍या कसोटी सामना न्यूझीलंडच्या एजाज पटेल (Ajaj Patel) या गोलंदाजाने गाजवला. अनिल कुंबळे (Anil Kumbale) आणि जीम लॅकरच्या (Jim Laker) विश्वविक्रमाची पटेलने बरोबरी केली.

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे.या खेळात कधी काही चमत्कार होईल हे सांगता येत नाही.अशाच एक चमत्कार भारत विरूध्द न्यूझीलंड कसोटी मालिकेत पहायला मिळाला आहे. मुंबई सुरू असल्या दुसर्‍या कसोटीत भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.भारताच्या पहिल्या डावात एजाज पटेल या भारतीय वंशाच्या न्यूझीलंडच्या गोलंदाजाने नवा इतिहास रचत भारताचा अख्खा संघ गारद करण्याची किमया केली आहे. यापुर्वी असाच विक्रम भारताचा माजी कर्णधार तथा फिरकीपटू अनिल कुंबळे यांनी पाकिस्तान विरुद्ध खेळल्या गेलेल्या एका सामन्यात केला होता. (India Vs Pakistan Test Match 1999 dehli)

दरम्यान कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात दहा विकेट घेण्याचा भीमपराक्रम यापुर्वी दोन गोलंदाजांनी केला होता. आता एजाज पटेल हा तिसरा गोलंदाज ठरला आहे. यापुर्वी 1956 साली इंग्लंडच्या जीम लॅकर या गोलंदाजाने मँचेस्टर येथे खेळल्या गेलेल्या ऑस्ट्रेलिया विरूध्दच्या कसोटी सामन्यात 10 गडी बाद करण्याचा विश्वविक्रम रचला होता. (England vs Australia Test Match 1956 Manchester)

त्यानंतर तब्बल 43 वर्षानंतर भारताच्या अनिल कुंबळेने सन 1999 साली दिल्लीत पाकिस्तान विरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात जीम लॅकरच्या विक्रमाची बरोबरी करत पाकिस्तानचा अख्खा संघ तंबूत धाडला होता. त्यानंतर तब्बल 22 वर्षाने पुन्हा या विक्रमाची मुंबईत बरोबरी झाली. न्यूझीलंडच्या एजाज पटेल या गोलंदाजाने जीम लॅकर व अनिल कुंबळेने केलेल्या विक्रमाची बरोबरी करण्याची किमया साधली आहे. एजाज पटेल याचा जन्म मुंबईतला आहे.

एजाज पटेलने घेतलेल्या दहा विकेट पहा खालील व्हिडिओमध्ये ⤵️